ETV Bharat / entertainment

यूट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायलनं घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर - Payal Malik

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 3:21 PM IST

Payal Malik : यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याची पत्नी पायल मलिक यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पायलनं तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. या मोठ्या निर्णयाबाबत पायलचं आता नवीन वक्तव्य समोर आलय.

Payal Malik
पायल मलिक (अरमान मलिक आणि पायल मलिक (ANI))

मुंबई Payal Malik : 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' सुरू झाल्यापासून, यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या पायलनं काही दिवसांपूर्वी पती अरमानशी घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं होतं. आता पायलनं स्पष्ट केलं आहे की, ती तिच्या पतीला घटस्फोट देणार नाही. पायल नेहमीच अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिकाच्या समर्थनात उभी राहिली आहे. पायलनं अरमान मलिकपासून वेगळे होण्यापेक्षा मेलेली बरी असं म्हटलंय. तिनं अरमान मलिकबाबत आपला निर्णय बदलला आहे.

पायल मलिकचा निर्णय : पायल मलिकनं तिच्या एका व्लॉगमध्ये म्हटलं आहे, "मी सकारात्मकता घेऊन आली आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आमच्या पाठीशी राहील. काही काळानंतर, नकारात्मकता दूर होईल. जेव्हा लोक आमचं सुखी कुटुंब पाहतील तेव्हा सर्व काही ठीक होईल. मला याबाबत पूर्ण खात्री आहे. पूर्वीही परिस्थिती चांगली नव्हती, पण आता सर्व काही ठीक आहे. या वेळीही गोष्टी ठीक होतील. मला माहीत आहे की तुम्ही लोक आमच्यावर प्रेम करणे कधीच थांबवणार नाही. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझं धैर्य वाढू शकले. मला माहीत आहे की, अनेक महिला माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या निर्णयाची वाट पाहात आहेत. मी त्या लोकांना सांगू इच्छिते की, मी माझं मत बदललं आहे."

लोकांच्या द्वेषामुळे कंटाळली पायल : यानंतर तिनं पुढं म्हटलं, "अरमान आणि कृतिकाचा विश्वास मी कधीही तोडणार नाही. मी माझं कुटुंब तोडणार नाही. देवानंही मला वेगळं व्हायला सांगितलं तर मी मरण पसंत करेन, हा माझा अंतिम निर्णय आहे." काही दिवसांपूर्वी पायलनं अरमानपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली होती. यानंतर ती खूप चर्चेत आली होती. पायलला तिच्या पतीपासून वेगळं व्हायचं होतं. तिनं एका व्लॉगमध्ये म्हटलं होतं की, "मी ड्रामा आणि लोकांच्या द्वेषामुळे कंटाळली आहे. जोपर्यंत हा द्वेष माझ्यापुरता मर्यादित होता तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण आता ते माझ्या मुलांपर्यंत पोहोचत आहे. हे खूप निराशाजनक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मी अरमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. तो कृतिकाबरोबर राहू शकतो तर, मी मुलांची काळजी घेईन." यानंतर अनेकांनी पायलला तिच्या निर्णयासाठी पाठिंबा दिला होता.

हेही वाचा :

  1. पायल मलिकच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये अरमान, कृतिकाला लागला झटका - BIGG BOSS OTT 3
  2. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये पत्नी कृतिकाला पाहून अरमान मलिक संतापला, कारण काय? - Bigg Boss Ott 3
  3. बिग बॉस ओटीटीमध्ये राडा, विशाल पांडेच्या 'त्या' शब्दामुळे अरमाननं मारली झापड - Bigg Boss ott 3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.