ETV Bharat / entertainment

कलादिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्कर सोहळ्यात 'इन मेमोरिअम'मध्ये आदरांजली - Nitin Desai Remembered in Oscar

Nitin Desai Remembered At Academy Awards : 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. ते भारतीय कला दिग्दर्शक डिझाइनर होते.

प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक नितीन देसाईंना अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'इन मेमोरिअम'मध्ये आदरांजली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 9:11 AM IST

लॉस एंजेलिस Nitin Desai Remembered At Academy Awards : ऑस्कर-नामांकित "लगान" आणि "हम दिल दे चुके सनम" सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी सेट तयार करणारे प्रसिद्ध निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचा 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'इन मेमोरिअम' विभागात सन्मानित झालेल्या चित्रपट व्यक्तिमत्त्वांमध्ये समावेश होता. रविवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

गेल्या वर्षी झाला होता मृत्यू : नितीन देसाई हे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईजवळील कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले होते. अकादमी पुरस्कार समारंभात 'इन मेमोरिअम' मॉन्टेजमध्ये गेल्या वर्षी निधन झालेल्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. नितीन देसाईंनादेखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित : निर्माते नितीन देसाई हे "जोधा अकबर" आणि "प्रेम रतन धन पायो" तसंच लोकप्रिय टीव्ही क्विज शो "कौन बनेगा करोडपती" सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कलाकृतींसाठीदेखील केलेले काम अविस्मरणीय ठरले. दोन दशकांहून अधिक काळ नितीन देसाई यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या प्रतिष्ठित दिग्दर्शकांसोबत काम केलं. त्यांच्या उत्कृष्ट योगदानामुळं त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसंच तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

एनडी स्टुडिओची स्थापना : नितीन देसाई 2005 मध्ये यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली. त्यांची मुंबईजवळ कर्जतमध्ये 52 एकरची मालमत्ता आहे. या स्टुडिओनं जोधा अकबर आणि ट्रॅफिक सिग्नल सारखे उल्लेखनीय चित्रपट तसेच कलर्सचा लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस होस्ट केलाय. नितीन देसाई यांच्या दुःखद निधनानं चित्रपटसृष्टीनं एक प्रतिभावान कलाकार गमावला.

हेही वाचा :

  1. Oscars 2024 : सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार देताना जॉन सीना पोहोचला मंचावर, 'त्या' कृतीनं झाला एकच हास्यकल्लोळ
  2. Oscars 2024 Winners List : ओपेनहाइमरनं पटकाविले सात पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
  3. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पलक तिवारीला गर्दीपासून वाचवताना झाला स्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.