ETV Bharat / entertainment

आदित्य रॉय कपूर ऐवजी रख्त ब्रम्हांडमध्ये सामंथा बरोबर झळकणार अलि फजल - Samantha Ruth Prabhu - SAMANTHA RUTH PRABHU

'रख्त ब्रह्मांड' मालिकेमध्ये आदित्य रॉय कपूरबरोबर सामंथा रुथ प्रभूची जोडी जमणार असल्याची चर्चा होती, मात्र त्या जागी अली फजलची एन्ट्री झाली आहे. 'मिर्झापूर 3' च्या यशानंतर अलिला हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मिळाला आहे.

Samantha Ruth Prabhu
रख्त ब्रम्हांडमध्ये सामंथा बरोबर झळकणार अलि फजल ((IANS/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 5:37 PM IST

मुंबई - सामंथा रुथ प्रभू आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी 'रख्त ब्रम्हांड'मध्ये असल्याच्या बातम्या झळकत होत्या. पण लेटेस्ट अपडेटमध्ये दिसत आहे की यामध्ये सामंथाची जोडी अभिनेता अलि फझल याच्याबरोबर असणार आहे. या पिरीयड ड्रामामध्ये या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

अली फझल, सध्या मिर्झापूर मालिकेच्या तिसऱ्या सीझनच्या यशानंतर उंच भरारी घेत असून, 'रख्त ब्रह्मांड'च्या कलाकारांमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात तो सामंथाबरोबर मुख्य भूमिका साकारणार आहे. 'तुंबाड' या दर्जेदार चित्रपटामधील आपल्या गाजलेल्या कामासाठी ओळखले जाणारे राही अनिल बर्वे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे.

"'रख्त ब्रह्मांड' हा राज आणि डीकेचा एक दूरदर्शी प्रकल्प आहे, जो कल्पनारम्य ड्रामा प्रकारात मोडणारा आहे. कलाकारांची निश्चिती पूर्ण झाल्यानं शूटिंग पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी आपल्या इतर कमिटमेंटचा बॅलन्स सांभाळत अलि फजल आपला ऑगस्ट महिना समर्पित करेल. या मालिकेतील अनोखी भूमिका आणि त्याच्या स्टाईलच्या प्रेमात पडल्यामुळं अलि फजलनं ही व्यक्तिरेखा स्वीकारली आहे, ” असं प्रॉडक्शनच्या जवळच्या स्त्रोतानं न्यूजवायरला सांगितलं.

पुढील आठवड्यात मुंबईत सहा भागांच्या मालिकेसाठी कॅमेरे ऑन होणार आहेत. सामंथा आणि अली व्यतिरिक्त, या मालिकेत आदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अली फझलसाठी, हा प्रकल्प अनुराग बसूच्या 'मेट्रो इन दिनो', आमिर खान निर्मित 'लाहोर 1947' आणि मणिरत्नमच्या 'ठग लाइ'फ यांसारख्या आगामी रिलीजच्या पार्श्वभूमीवर मिळाला आहे.

हेही वाचा -

  1. अली फजल साऊथ चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, कमल हासन स्टारर 'ठग लाइफ'मध्ये झाली एंट्री - ali fazal
  2. रिचा चढ्ढा आणि अली फझल यांनी निर्माते म्हणून केली 6 चित्रपटांची घोषणा, पाहा तपशील
  3. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूनं आरोग्य आणि नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.