मुंबई - Nita Ambani : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी 12 जुलै रोजी राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी अंबानी कुटुंब तयारीत व्यग्र आहे. दरम्यान, अलीकडेच रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी सोमवारी वाराणसीला पोहोचल्या. त्यांनी मुलगा अनंत अंबानी आणि भावी सून राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे आमंत्रण बाबा विश्वनाथ यांच्या चरणी ठेवलं. यावेळी नीता अंबानी यांनी सांगितलं की, ती स्वत:ला खूप भाग्यवान समजते की तिला वाराणसी आणि काशी विश्वनाथ मंदिरात जाण्याची संधी मिळाली. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नीता अंबानींनी काशीमध्ये चाटचा आनंद घेतला : या व्हिडिओत नीता अंबानी एका साध्या रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. काशी विश्वनाथचे दर्शन घेतल्यानंतर नीता अंबानीनं काशीतील रेस्टॉरंटमध्ये बसून काशी चाटचा आनंद लुटला. अरबांची मालकिन असून एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये चाट खाल्यानंतर आता त्या चर्चेत आल्या आहेत. नीता अंबानीला चाट इतकी आवडली की तिनं दुकानदाराला त्याची रेसिपीही विचारली. यावर दुकानदारनं उत्तर दिलं की, चाट तव्यावर बनवली जाते. यानंतर नीता विचारते की यात सर्व काय टाकलं आहे, दुकानदार सांगतो की यात अनेक गोष्टी आहेत. यानंतर नीता चाट खायला लागते.
#WATCH | Varanasi, Uttar Pradesh: Founder and Chairperson of Reliance Foundation Nita Ambani visits a chaat shop and interacts with locals pic.twitter.com/1QIY4Ha0xs
— ANI (@ANI) June 24, 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न : नीता अंबानींचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न लवकरच करणार असून हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तीन दिवस चालणार आहे. याची सुरुवात 12 जुलै रोजी शुभ विवाहानं होईल. यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ होईल. तसेच ड्रेस कोडबद्दल बोलायचं झालं तर या भव्य शाही विवाहासाठी 'इंडियन फॉर्मल' ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री-वेडिंग देखील खूप धमाकेदार पद्धतीनं आटोपली होती.
हेही वाचा :