ETV Bharat / entertainment

पत्रकारानं अरबाज पटेलबद्दल विचारलेला प्रश्न ऐकून निक्की तांबोळीचा चेहरा पडला, नवीन प्रोमो व्हायरल... - Nikki tamboli - NIKKI TAMBOLI

Bigg Boss Marahi 5: 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता अनेकांना आवडत आहे. अनेकजण 'भाऊच्या धक्क्या'ची वाट पाहात असतात. मात्र यावेळी बिग बॉसच्या घरात शनिवार आणि रविवारी वेगळं काही पाहायला मिळणार आहे, काय आहे ते जाणून घेऊया...

Bigg Boss Marahi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 2:28 PM IST

मुंबई Bigg Boss Marahi 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा 8वा आठवडा सध्या खूप चर्चेत आहेत. हा सीझन सुरू होऊन जवळपास 50 दिवस पूर्ण झाले आहेत. आता दिवसेंदिवस घरात खेळ हा आणखीनच रोमांचक होताना दिसत आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीला घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. बिग बॉसनं दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली आहे. एका टीममध्ये अरबाज, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर आणि सूरज चव्हाण हे पाच सदस्य होते. दुसऱ्या टीममध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे आणि संग्राम चौगुले हे पाच सदस्य असल्याचं दिसलं.

निलेश साबळेचा होणार घरात प्रवेश : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये दर शनिवारी आणि रविवारी भाऊच्या धक्क्या'वर स्पर्धकांची शाळा घेतली जाते. या आठवड्यात घरात स्पर्धकांना 'भाऊचा धक्का' नाही तर मोठा धक्का मिळेल. या आठवड्यात भाऊचा धक्क्याऐवजी महाराष्ट्राचा धक्का हा स्पर्धकांना मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांना यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहेत. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये घरात 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे प्रवेश करताना दिसत आहे. घरात आल्यानंतर निलेश हा काही सदस्यांना त्याच्या विनोदी शैलीत टोमणे आणि प्रश्न विचारताना दिसत आहे.

अरबाजबद्दलच्या प्रश्नावर निक्की झाली नाराज : याशिवाय आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही पत्रकार बॉसच्या घरात बसून सदस्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये काही पत्रकार बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्यांना प्रश्न विचारून, त्यांना विचार करण्यावर भाग पाडताना दिसत आहेत. दरम्यान प्रोमोत एका पत्रकारानं निक्कीला थेट अरबाजच्या जाण्यावर प्रश्न विचारून चिंतेत टाकलं आहे. यात त्यानं निक्कीला विचारलं, "तुला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल, यानंतर तुला दुसरा साथीदार पाहिजे?" हा प्रश्न ऐकताच निक्की ही नाराज होताना दिसते. आता ती या प्रश्नाचं उत्तर काय देणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये पंढरीनाथ कांबळेनं वर्षा उसगावकरला कॅप्टन्सी टास्कदरम्यान चांगलच सुनावलं, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi 5
  2. अरबाज पटेल-संग्राम चौगुलेमध्ये होणार राडा, कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो व्हायरल - bigg boss marathi
  3. बीबी करन्सी मिळविण्यात अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर झाले अयशस्वी, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.