ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात भाजीवरुन झाली झुंज - Nikki Tamboli VS Varsha Usgaonkar - NIKKI TAMBOLI VS VARSHA USGAONKAR

Bigg Boss Marathi 5 : निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात अनेकदा वाद होताना बिग बॉसच्या घरात दिसते. आता एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पुन्हा एकदा निक्की आणि वर्षाताईबरोबर वाद करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 12:14 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात घनश्याम दराडे घराबाहेर गेला. आता या शोमध्ये संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. घरामधील नॉमिनेशन टास्क पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा वादावादी पाहायला मिळत आहे. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात जोरदार वादावादी होताना दिसत आहे. नवीन प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षाताईंमध्ये भाजीवरुन भांडण झालं आहे. प्रोमोत निक्की वर्षा उसगांवकरांना म्हणते,"इथे लोकांना या घरात अन्न मिळत नाही आणि तुम्ही सरळ भाज्या फेकत आहात." यावर उत्तर देत वर्षाताई म्हणतात की,"कारण मला ती भाजी खराब वाटली." यानंतर दोघींमध्ये थोडे वाद होतात.

संग्राम चौगुलेच्या प्रवेशामुळे घरातील सदस्यांमध्ये आला बदल : दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर आता घरातील वातावरण बदलताना दिसत आहे. संग्रामनं पहिल्याच दिवशी अरबाज आणि निक्कीबरोबर पंगा घेतला आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाज संग्रामविरोधात आहे. तसेच संग्राम हा घरातील इतर सदस्यांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या आठवड्यातही एका सदस्याचा घरामधील प्रवास समाप्त होणार आहे. घरातील नुकतेच नॉमिनेशन टास्क पूर्ण झालं आहे. यावेळी यामध्ये सूरज चव्हाण आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुले हे दोघेही सुरक्षित आहेत.

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात कोण झालं नॉमिनेट : या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, आर्या जाधव आणि वैभव चव्हाण हे आहेत. यामुळे या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर जाईल, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अनेकांना या शोमध्ये निक्की पाहिजे नसल्याच्या प्रतिक्रिया यूजर्स देत आहे. वर्षाताई आणि निक्कीच्या वादावादीच्या प्रोमोवर अनेजण कमेंट्स करत आहेत. काही यूजर्स निक्की मूर्ख असल्याचं म्हणत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये संग्राम चौगुले विरुद्ध निक्की तांबोळीची लढत, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुलेनं घेतला निक्की आणि अरबाजबरोबर पंगा... - Sangram Chougule fight with nikki
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख निक्की तांबोळीला देणार मोठी शिक्षा, प्रोमो व्हायरल - BIGG BOSS MARATHI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.