ETV Bharat / entertainment

जोनास ब्रदर्स 2024च्या लोल्लापलूझासाठी आले भारतात , चाहत्यांनी म्हटलं निकला 'जीजू' - Lollapalooza India 2024

Lollapalooza India 2024 : जोनास ब्रदर्स हे मुंबई विमातळावर स्पॉट झाले आहेत. दरम्यान प्रियांका चोप्राचा पती निक हा 2024 च्या लोल्लापलूझामध्ये परफॉर्म करणार आहे.

Lollapalooza India 2024
लोल्लापलूझासा इंडिया 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 1:54 PM IST

मुंबई - Lollapalooza India 2024 : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान प्रियांका चोप्रानं नुकतच सांगितलं होतं की, तिचा पती निक जोनास हा त्याच्या भावासह परफॉर्म करण्यासाठी भारतात येणार आहे. दरम्यान आज 27 जानेवारीला निक जोनास आपल्या दोन्ही भावांबरोबर स्टेजवर गाताना दिसणार आहेत. लोल्लापलूझा इंडिया 2024 या कार्यक्रमात आपल्या गाण्यांनी जोनास ब्रदर्स प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दरम्यान जोनास ब्रदर्स मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत.

जोनास ब्रदर्स झाले मुंबई विमातळावर स्पॉट : जोनास ब्रदर्सचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट्स करत आहे. प्रियांका चोप्राच्या एका चाहत्यानं लिहिलं,''जीजू आले आहेत.'' दुसऱ्या एका चाहतानं लिहिलं, ''निकचा शो हा खूप जबरदस्त असणार आहेत.'' लोल्लापलूझा हा कार्यक्रम हा 27-28 जानेवारी रोजी होणार आहे. शुक्रवारी प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर सांगितलं होत की, ''निक हा एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी भारतात येत आहे.'' यानंतर प्रियांकानं निक आणि मालतीचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या मुलीबरोबर खेळत होता.

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : प्रियांका चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. याआधी तिनं काही खास फोटो मुलगी मालती मेरीच्या वाढदिवसामधील शेअर केले होते. या फोटोमध्ये प्रियांका आणि निक मालतीसोबत एंजॉय करताना दिसले.दरम्यान प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, ती शेवटी वेब सीरीज 'सिटाडेल'मध्ये अभिनेता रिचर्ड मॅडन सोबत दिसली होती. या वेब सीरीजचं दिग्दर्शन न्यूटन थॉमस सिगेल आणि जेसिका यू यांनी केलं होतं. पुढं ती कल्पना चावला बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
  2. मृणाल ठाकूरनं हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपट न मिळाल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त
  3. बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.