ETV Bharat / entertainment

निक जोनासची प्रकृती चिंताजनक, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मागितली माफी... - nick jonas apologises to fans - NICK JONAS APOLOGISES TO FANS

Nick Jonas and priyanka chopra : निक जोनासची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याच्या मेक्सिको आणि मॉन्टेरी सिटीमध्ये होणार कॉन्सर्टची तारीख पुढे ढकण्यात आली आहे. त्यानं आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या प्रकृतीबद्दल माहिती चाहत्यांना दिली आहे.

Nick Jonas and priyanka chopra
निक जोनास आणि प्रियांका चोप्रा (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 12:53 PM IST

मुंबई - Nick Jonas and priyanka chopra : निक जोनास पॉप बॉय बॅन्ड जोनास ब्रदर्सचा एक भाग आहे. गायक निक हा पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीबरोबर अनेकदा आपले फोटो शेअर करत असतो. दरम्यान, आता प्रियांका चोप्राच्या पतीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. तसेच जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट टूर पुढे ढकलण्याचे कारण देखील त्यानं व्हिडिओत सांगितलं आहे. आता निकनं शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्यानं व्हिडिओद्वारे सांगितलं की, "मी निक आहे. माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक बातम्या आहे, जी कदाचित मजेदार नसेल, परंतु सांगणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मला काहीतरी विचित्र वाटू लागलं होतं. जेव्हा मला जाग आला तेव्हा मला बोलता येत नव्हते आणि त्या रात्री मी कॉन्सर्टसाठी सराव करत होतो. गेल्या दोन दिवसांपासून माझी प्रकृती हळूहळू खराब होत आहे. मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप वाईट खोकला मला आहे."

निक जोनासनं शेअर केला व्हिडिओ : यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "डॉक्टरांना दाखवूनही माझी तब्येत बरी झाली नाही. याशिवाय त्यानं या पोस्टवर लिहिलं होत की, "हाय मित्रांनो. मी आजूबाजूला पसरत असलेल्या इन्फ्लूएंझा-एच्या धोकादायक ताणानं त्रस्त आहे आणि याक्षणी मी कोणत्याही कॉन्सर्टमध्ये गाऊ शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. हे शो आता ऑगस्टमध्ये होतील. याशिवाय त्यांन कॉन्सर्टच्या डेट देखील आपल्या पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत. निक 'इन्फ्लूएंझा ए' आहे. आता निकची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहे. आता अनेकजण निक जोनासला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

निक जोनासचं वर्कफ्रंट : दरम्यान निकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'द गुड हाफ' या चित्रपटामध्ये ड्वेन जॉनसनबरोबर दिसला होता. त्याचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर ब्रिटनी स्नो ही अभिनेत्री दिसली होती. हा चित्रपट 8 जून 2023 रोजी रिलीज झाला होता.

हेही वाचा :

  1. 'दृश्यम'चा रिमेक न केल्याबद्दल कमल हासनविरोधात तक्रार दाखल! - Kamal Haasan
  2. "चित्रा वाघ यांनी माफी मागितली नाहीतर, अब्रू नुकसानीचा दावा करणार" : अभिनेता राज नयानीचा इशारा - Raj Nayani warns
  3. एसएस राजामौली दिग्दर्शित 'SSMB29' चित्रपटाच्या अपडेटसाठी चाहते आतुर - SSMB29

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.