ETV Bharat / entertainment

हार्दिक पांड्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त केली हृदयस्पर्शी पोस्ट, पाहा व्हिडिओ - Natasa Hardik Son Birthday - NATASA HARDIK SON BIRTHDAY

Natasa Hardik Son Birthday : नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या खूप चर्चेत आहे. आज हार्दिकच्या मुलाचा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्यानं आपल्या मुलाबरोबरचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

Natasa Hardik Son Birthday
नतासा हार्दिकच्या मुलाचा वाढदिवस ((फाईल फोटो) (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 12:27 PM IST

मुंबई - Natasa Hardik Son Birthday : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा मुलगा अगस्त्यचा आज, 30 जुलै रोजी वाढदिवस आहे. नताशा आणि हार्दिक यांनी 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केलं होतं. आता लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघंही विभक्त झाले आहेत. नताशा आणि मुलापासून दूर राहिल्यानंतरही हार्दिक पांड्या त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करतो. आज हार्दिकनं त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक हा आपल्या मुलाबरोबर वेगवेगळे खेळ खेळताना दिसत आहे.

हार्दिक पांड्यानं मुलाबरोबर केला व्हिडिओ शेअर : हार्दिकनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "तू मला रोज पुढे जाण्यास मदत करतोस, माय पार्टनर इन क्राइम तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्यावर खूप प्रेम आहे." नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी 18 जुलै रोजी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती. आपापल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना दोघांनी लिहिलं होतं, "4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही परस्पर संमतीनं वेगळे होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही मिळून आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विश्वास आहे की, हे आमच्या दोघांच्या हिताचं आहे." या पोस्टमध्ये त्यांनी पुढं लिहिलं की, आमच्यासाठी "हा एक कठीण निर्णय होता, कारण आम्ही एकत्र खूप सुंदर राहिलो, यामुळे आमचे कुटुंब वाढले. देवाच्या कृपेनं आम्हाला अगस्त्य मिळाला, आता तो आमच्या दोघांच्याही जीवनाच्या केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते नक्की करू यांची खात्री आम्हा दोघांना आहे. या कठीण काळात तुम्ही आम्हाला प्रायव्हसी द्यायला हवी, अशी आम्ही विनंती करतो."

नताशा स्टॅनकोविकचा हार्दिकपूर्वीचा बॉयफ्रेंड : नताशा स्टॅनकोविक आता सर्बियातील तिच्या गावी मुलगा अगस्त्यबरोबर गेली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, अनेकदा ती आपल्या मुलाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हार्दिकनं अलीकडेच अंबानीच्या लग्नात खूप जोरदार डान्स केला होता. यानंतर तो खूप चर्चेत आला होता. नताशा लग्नाआधी, टेलिव्हिजन अभिनेता अली गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनी रिअ‍ॅलिटी डान्स शो, 'नच बलिए'मध्ये एकत्र भाग घेतला होता.

हेही वाचा :

  1. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्यसह दिली सर्बियातील संग्रहालयाला भेट - NATASA STANKOVIC
  2. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविचची पहिली सोशल मीडिया पोस्ट - Natasa Stankovic post
  3. अखेर हार्दिक-नताशाचं नातं तुटलं; दोनदा लग्न करुनही चार वर्षांत मोडला 'संसार' - Hardik Natasa Divorce

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.