ETV Bharat / entertainment

'पक्षी इवल्याशा चोचीने आभाळ पिऊन टाकतो'; 'नाना छंद' या गीतांच्या अल्बमचं मुंबईत प्रकाशन - Nana Patekars song album - NANA PATEKARS SONG ALBUM

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या 'नाना छंद' या गीतांच्या अल्बमचं मुंबईत प्रकाशन झालंय. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्याच्याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली.

Nana Patekar
नाना पाटेकर (Reportert)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 4:12 PM IST

Updated : Jul 6, 2024, 5:48 PM IST

मुंबई - Nana Patekar : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता नाना पाटेकर हे गेल्या अनेक वर्षापासून हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात आणि नाट्यभूमीवर विविध दर्जेदार भूमिका करत आहेत. नाना पाटेकर यांच्यामध्ये एक सुंदर कवी आणि गीतकार सुद्धा दडलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'नाना छंद' गीतांचा अल्बम हा मुंबई एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला आहे. 'कैसे बताऊ मैं, तुम्हे तुम मेरे लिए कौन हो?' नाना पाटेकर यांच्या एका हिंदी चित्रपटातील हा संवाद खूप लोकप्रिय झाला आहे. नाना पाटेकर पडद्यावर भूमिका साकारताना अनेकदा अत्यंत संवेदनशील असल्याचं आपण पाहतो. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये संवाद फेक करताना छोट्या छोट्या कविता अथवा शायरी केल्याचं आपण पाहिलं आहे.

नाना पाटेकर (Reportert)

'नाना छंद' अल्बम लॉन्च : नाना पाटेकर यांनी विविध भूमिका पडद्यावर करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाना पाटेकर यांच्यामध्ये एक कवी आणि सृजनशील गीतकार दडला आहे हे नुकतेच समोर आलं आहे. सागरीका म्यूझिकद्वारे नाना पाटेकर यांनी लिहिलेल्या 'नाना छंद' या तीन गीतांच्या अल्बमचं अनावरण मुंबईत करण्यात आलं. सागरीका म्यूझिकला 25 वर्ष झाल्या निमित्तानं हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. नाना पाटेकर यांनी लिहिलेल्या गीतांना वैशाली सामंत स्वप्निल बांदोडकर आणि राहुल देशपांडे यांनी गायलं आहे तर निलेश मोहरीर यांनी याला संगीत दिलय. 'गंध तुझ्या पावलांचा हिरवा हळवा आणि दहिवर' या अल्बममध्ये ही तीन गीतं आहेत. या गीतांचं लेखन नाना पाटेकर यांनी केलय. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर अभिनेता सचिन पिळगावकर, गायक सुदेश भोसले यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.

नाना पाटेकरांनी व्यक्त केल्या भावना : या कार्यक्रमात यावेळी नाना पाटेकर म्हणाले, "मी कवी आणि गीतकार आहे असं मला वाटत नाही, परंतु मला जे निसर्गात समोर दिसतं ते मी कागदावर उतरवत जातो. मी शहरापासून दूर माझ्या शेतावर गेल्यावर, मला आपसूक शब्द सुचतात. शेतावर गेल्यानंतर मनाचा बकालपणा दूर होतो आणि तुमच्या आतील घुसमट मोकळी होते. शेतावर माझ्यासमोर पाऊस पडल्यानंतर साचलेल्या डब्यात एक चिमणी पाणी पीत होती. त्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलं होतं. त्यावेळी मला सहज सुचलं, इवल्या चोचीनं चिमणीनं आभाळ पिऊन घेतलंय" त्यामुळे नाना पाटेकरांनी लिहिलेली ही संवेदनशील गाणी यावेळी अनेकांना आवडली.

हेही वाचा :

  1. कमल हासन स्टारर 'इंडियन 2'चा प्री रिलीज इव्हेंट होणार 'या' दिवशी - indian 2 pre release event
  2. अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा - akshay wishes birthday ranveer
  3. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY

Last Updated : Jul 6, 2024, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.