ETV Bharat / entertainment

प्रत्येक क्षणाला मतीगुंग करणारा 'सरफिरा'चा ट्रेलर लॉन्च, प्रेक्षकांना चक्रावून सोडण्यासाठी अक्षय कुमार सज्ज - Sarafira trailer - SARAFIRA TRAILER

SARAFIRA TRAILER : अक्षय कुमार स्टारर सरफिरा या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. चक्रावून टाकणाऱ्या माणसाची उत्कंठा वाढवणारी कथा आणि अक्षय कुमारचा नवा उत्साह ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित, सरफिरा हा त्याच्याच तामिळ हिट 'सूरराई पोत्रूचा' हिंदी रिमेक आहे.

Sarafira trailer
'सरफिरा'चा ट्रेलर लॉन्च (abundantiaent Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 12:49 PM IST

मुंबई - SARAFIRA TRAILER : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असताना काल अक्षयनं 'सरफिरा'चं आकर्षक पोस्टर लॉन्च केलं होतं. "सपने लो नहीं जे आप सोते हुए देखते है, सपनें वो होते जो आपको सोने ही नहीं देते", असं लिहित अत्त्क्षयनं चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

सामान्य माणूसदेखील विमानानं प्रवास करु शकेलं असं स्वप्न बाळगलेल्या एका ध्येय वेड्या 'सरफिरा' व्यक्तीची ही कथा आहे. पायलट म्हणून निवृत्त झालेल्या एका जिद्दी तरुणानं ठरवलं की आपली स्वतःची विमान वाहतुक सेवा सुरू करायची. यासाठी सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत शुल्क आकारायचं. ज्या अनावश्यक गोष्टी विमान कंपन्या देतात त्याला फाटा देऊन कमीत कमी खर्चात विमानाचं तिकीट कसं होऊ शकत याचं नियोजन करुन प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या एका वेड्या माणसाची ही गोष्ट. अक्षय कुमारनं सरफिराची भूमिका त्याच्या नेहमीच्या दमदार स्टाईलमध्ये साकारल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट दिसत आहे. 'सरफिरा'च्या ट्रेलरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 'U' प्रमाणित केलं आहे.

'सरफिरा' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट सुधा यांच्या तामिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता सुर्यानं साकारलेली भूमिका 'सरफिरा'मध्ये अक्षय कुमार करत आहे. या चित्रपटात परेश रावल, राधिका मदान आणि सीमा बिस्वास यांच्यासह उत्कृष्ट सहाय्यक कलाकारांचा समावेश आहे. सुधा कोंगारा आणि शालिनी उषादेवी यांनी रचलेली कथा, पूजा तोलानीच्या संवादांसह, 'सरफिरा' 12 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'सरफिरा' या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि तिचा पती सुर्या विशेष भूमिकेत झळकणार आहेत.

'सरफिरा' या चित्रपटाची निर्मिती 'एअरलिफ्ट', 'बेबी', ' जय भीम ', ओएमजी 2', 'टॉयलेट एक प्रेम कथा', अरुण भाटिया (गुड फिल्म्सची कॅप), सूर्या आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट), विक्रम मल्होत्रा (2 डी एंटरटेनमेंट) हे करत आहेत. या चित्रपटाला जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीत दिलंय. दरम्यान या चित्रपटाची कहाणी ही शालिनी उषादेवी आणि पूजा तोलानी यांनी लिहिली आहे.

'सरफिरा' या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि तिचा पती सुर्या विशेष भूमिकेत झळकणार आहेत. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'खेल खेल में ', 'स्काय फोर्स', 'वीर दौडाले सात', 'सी शंकरन बायोपिक', 'हाउसफुल 5','साइको', 'हेरा फेरी 3', 'जॉली एलएलबी 3', 'राउडी राठौर 2' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, रवीना टंडन, अनिल कपूर, सुनील शेट्टी, लारा दत्ता, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, परेश रावल आणि इतर कलाकरांबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा -

नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction

'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed

उर्वशी रौतेला अभिनीत 'जेएनयू'चा ट्रेलर पाहून युजर्स भडकले - Jahangir National University

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.