ETV Bharat / entertainment

मृणाल ठाकूरनं हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपट न मिळाल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त - अभिनेत्री मृणाल ठाकूर

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरला हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक चित्रपट न मिळाल्यानं ती नारज आहे. याबद्दल तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

Mrunal Thakur
मृणाल ठाकूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 6:04 PM IST

मुंबई - Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या 'हाय नन्ना' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं दमदार कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं होतं. जानेवारीच्या सुरुवातीला ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर, मृणालचा तेलुगू चित्रपट अनेकांना पसंत पडला आहे. 'हाय नन्ना' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचीही चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान या चित्रपटामध्ये मृणालनं साऊथ अभिनेता नानीसोबत काम केलं होतं. साऊथमध्ये दोन उत्कृष्ट रोमँटिक प्रेमकहाणी केल्यानंतरही मृणालला हिंदीत रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नाहीत.

मृणाल ठाकूरला हिंदीत रोमँटिक चित्रपट नाही : 'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले, मात्र तिला हिंदीत रोमँटिक चित्रपट मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं याबद्दल टोमणा मारला आणि म्हटलं, ''मला माहीत नाही, कदाचित मी अद्याप प्रेमकहाणीत घेण्याइतकी लोकप्रिय नाही. माझी चूक आहे का? एखाद्या प्रेमकहाणीचा चित्रपट मिळवण्यासाठी मला लोकप्रिय व्हायलाच हवं ना?'' मृणाल पुढं म्हणते, ''मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, पण त्या रोमँटिक कहाणी नाहीत. मी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून थकले आहे.''

मृणाल ठाकूरचा वर्कफ्रंट : 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हटल्या जाणार्‍या मृणालनं म्हटलंय, ''मला आनंद आहे की 'हाय नन्ना' आणि 'सीता रामम' अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये मी काम केलं. तिला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हटल्यावर ती खूप भावूक झाली, कारण शाहरुख खानला 'किंग ऑफ रोमान्स' हिंदी चित्रपटसृष्टीत म्हटला जातो. मृणालनं 2018 मध्ये 'लव्ह सोनिया' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिनं या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीसोबत काम केलंय. तिला या चित्रपटामध्ये अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हिंदीत मृणालनं 'बाटला हाउस', 'तुफान' आणि 'जर्सी' यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाहीत. आता लवकरच मृणाल विजय देवरकोंडासोबत 'फॅमिली स्टार'मध्ये दिसेल. याशिवाय ती दिग्दर्शक नवज्योत गुलाटी यांच्या 'पूजा मेरी जान' या चित्रपटात काम करत आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगणचा थ्रिलर चित्रपट 'शैतान'चा टीझर रिलीज ; पाहा व्हिडिओ
  2. बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख
  3. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' बॉक्स ऑफिसवर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.