ETV Bharat / entertainment

'या' मालिकेमुळं चमकलं मृणाल ठाकूरचं नशीब, झाली बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री - Mrunal Thakur - MRUNAL THAKUR

Mrunal Thakur: आज मृणाल ठाकूरचा वाढदिवस आहे. टेलिव्हिजन ते बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा खूप सोपा नव्हता. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

Mrunal Thakur
मृणाल ठाकूर ((ANI/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 12:26 PM IST

मुंबई - Mrunal Thakur: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर आज, 1 ऑगस्ट रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. मृणालनं बॉलिवूडपेक्षा जास्त साऊथमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मृणालनं अनेक हिट टीव्ही शोमध्येही काम केलं होतं. दरम्यान मृणालकडे अनेक साऊथ चित्रपटांमधील ऑफर्स आहेत. तिन याआधी प्रभास स्टारर 'कल्कि 2898 एडी'मध्ये कॅमियो केला होता. यामधील तिचा अभिनय अनेकांना आवडला होता. आज मृणालच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही कदाचित आधी ऐकल्या, वाचल्या नसतील.

मृणाल ठाकूरचा वाढदिवस : मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. तिनं 2012 मध्ये 'मुझसे कुछ कहती...ये खामोशियां' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, मात्र तिला पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. यानंतर तिन झी टीव्हीच्या 'कुमकुम भाग्य' या हिट शोमध्ये काम केलं. या शोनंतर ती प्रसिद्धीझोतात आली. टीव्हीच्या दुनियेत प्रसिद्ध झाल्यानंतर मृणाल चित्रपटांकडे वळली. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी तिनं खूप संघर्ष केला. आजही तिचा संघर्ष सुरूच आहे. मृणालनं स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुरुवातीला ती अनेकदा निराश होऊन रडली आहे.

मृणाल ठाकूरबद्दल : मात्र तिचे आई-वडील तिला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे आणि म्हणायचे की एक दिवस तू जगासमोर उदाहरण बनशील, यानंतर तिनं कधी हिंमत हरली नाही. ती प्रयत्न करत गेली. मृणाल ठाकूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तिची 'सुपर 30' मधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ती जॉन अब्राहमबरोबर 'बाटला हाऊस' आणि 'तूफान' चित्रपटात फरहान अख्तरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. मृणाली ही 'हाय नन्ना', 'सीतारमण' आणि 'द फॅमिली स्टार' या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली आहे. दरम्यान मृणालच्या संपत्तीबद्दल बोलालचं झालं तर एका रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 33 कोटी रुपये आहे.

हेही वाचा :

  1. मृणाल ठाकूरनं 'कल्की 2898 एडी' टीमचं केलं कौतुक, शेअर केली पोस्ट - mrunal thakur
  2. अजय देवगण स्टारर 'सन ऑफ सरदार 2'मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री... - mrunal thakur
  3. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर 'फॅमिली स्टार' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - family star

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.