ETV Bharat / entertainment

जान्हवी आणि राजकुमार रावच्या 'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज तारीख ठरली, ट्रेलरचे काऊंट डाऊन सुरू - Mr and Mrs Mahi - MR AND MRS MAHI

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि ट्रेलर रिलीजच्या घोषणेमुळे त्याला आणखी प्रोत्साहन मिळालं आहे. चित्रपटाचा ट्रेलर 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mr & Mrs Mahi
'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज तारीख ठरली (Mr & Mrs Mahi poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 3:59 PM IST

मुंबई - जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या भूमिका असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे निर्माते उद्या रविवारी १२ मे रोजी चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांच्यातील उत्सुकता स्पष्ट आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्माते ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करत शनिवारी सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर जारी केलं आहे.

इन्स्टाग्रामवर नवीन पोस्टर शेअर करताना, चित्रपट निर्माता करण जोहरने चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरमध्ये जान्हवी आणि राजकुमार त्यांच्या क्रिकेट संघाच्या पोशाखात, एकमेकांकडे प्रेमानं पाहताना दिसत आहेत. पोस्टरवर लिहिलेली "अ गुगली ऑफ अ लव्ह स्टोरी" ही टॅगलाइन चित्रपटात अनोख कथानक असल्याचं दर्शवत आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचा ट्रेलर स्टार स्पोर्ट्सवर दुपारी 2:40 वाजता प्रदर्शित होईल. त्यानंतर दुपारी 3:40 वाजता हा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज होईल. रविवारी 12 मे रोजी रिलीज होणाऱ्या ट्रेलर पाहण्यासाठी सज्ज राहा असे सांगतानाच करण जोहरने हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं कळवलं आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये राजकुमार राव महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारणार आहे, तर जान्हवी कपूर महिमाची भूमिका साकारणार आहे. 2020 मध्ये 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'मधून पदार्पण करणारा शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 'धडक', 'रूही' आणि 'मिली' नंतर जान्हवीचा चौथा थिएटरमध्ये रिलीज होणारा चित्रपट आहे. जान्हवीचे पुढील वर्षही खूप बिझी जाणारं आहे कारण ती आणखी दोन चित्रपटाच्या रिलीजची तिला प्रतीक्षा राहील. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्यासह राजकीय थ्रिलर 'उलझ' आणि पॅन-इंडिया प्रोजेक्ट 'देवरा' यांचा समावेश आहे.

राजकुमार राव याचे देखील 'स्त्री 2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हे दोन चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहेत. 'मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलरचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जान्हवी आणि राजकुमार यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी दोघांचेही चाहते आतुर झाले आहेत.

हेही वाचा -

  1. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan
  2. 'सरफरोश'ला 25 वर्षे पूर्ण, आमिर खाननं स्क्रिनिंगदरम्यान 'सरफरोश 2'ची केली घोषणा - aamir khan
  3. राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - rajkummar rao

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.