ETV Bharat / entertainment

गरोदर दीपिका पदुकोणचा 'सिंघम अगेन'च्या सेटवरील फोटो झाला व्हायरल - deepika padukone - DEEPIKA PADUKONE

Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 1:17 PM IST

Updated : Apr 17, 2024, 4:49 PM IST

मुंबई - Deepika Padukone : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. नुकतीच तिनं तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता तिचे चाहते तिच्या पहिल्या मुलाच्या जगात येण्याची वाट पाहत आहेत. याआधी दीपिका पदुकोणचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका लेडी कॉपच्या लूकमध्ये दिसत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटाची शुटिंग खूप वेगानं सुरू आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा लूक : दरम्यान दीपिका पदुकोण फोटोत खाकी गणवेशात लेडी दबंग दिसत आहे. तसेच तिनं तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. याशिवाय तिनं डोळ्यावर चष्मा लावलेला आहे. दीपिकाचा हा दमदार लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी या चित्रपटासाठी एक मेगा डान्स नंबर देखील शूट करणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत, मात्र दीपिका गरोदर असल्यानं ती हे करू शकणार नाही. या चित्रपटामध्ये दीपिका अ‍ॅक्शन करताना देखील दिसणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'सिंघम अगेन' हा चित्रपट 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच याच दिवशी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपटही रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची रुपेरी पडद्यावर टक्कर होताना दिसणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंट, जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्ससह रोहित शेट्टी पिक्चर्स अंतर्गत तयार केला जात आहे. दरम्यान दीपिकाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती 'लव्ह 4 एव्हर' आणि प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सलमानच्या जीवावर उठलेल्यांना सलमीन खाननी म्हटलं 'जाहिल लोग', मुंबई पोलिसांचं केलं कौतुक!! - Salman Khan
  2. सुपरस्टार विक्रम साजरा करतोय 58 वा वाढदिवस, 2024 मध्ये अर्धा डझन चित्रपट रिलीजसाठी सज्ज - happy birthday vikram
  3. विद्या बालननं सांगितला 'दो और दो पांच'च्या शीर्षकाचा किस्सा, फुल्ल टू धमाल कॉमेडी करायची व्यक्त केली इच्छा! - Vidya Balan interview

Last Updated : Apr 17, 2024, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.