ETV Bharat / entertainment

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू - मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty Hospitalised: ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलंय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 12:09 PM IST

Updated : Feb 10, 2024, 12:42 PM IST

कोलकाता Mithun Chakraborty Hospitalised : ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना कोलकात्यात शूटिंग सुरू असताना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना शूटिंग दरम्यान अचानक छातीत कळ आली होती. अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्यांची आता तब्येत कशी आहे याबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते विचारपूस करत असून ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना अलिकडेच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ''हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे. मला खूप बरे वाटत आहे.इतकं प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार माझ्या जगभरातील चाहत्यांसाठी आहे ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिले आहे. माझा हा पुरस्कार सर्व हितचिंतकांना जातो.''

द काश्मीर फाइल्ससाठी पुरस्कार - वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये मिथून सुमन घोषच्या सुपरहिट बंगाली चित्रपट 'काबुलीवाला' मध्ये दिसले होते. 2022 मध्ये, त्यांनी विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त IAS ची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा 'फिल्मफेअर पुरस्कार'ही मिळाला होता.

मिथून हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहेतत. त्यांना डिस्को डान्सर म्हणूनही ओळखले जाते. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 'परिवार', 'मेरा यार मेरा दुश्मन', 'बात बन जाए' आणि 'दीवाना तेरे नाम' यांसारख्या सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्कृष्ट चित्रपटांव्यतिरिक्त, त्याने अनेक टेलिव्हिजन मालिका आणि नृत्य कार्यक्रमांचे न्यायाधीश देखील केले आहेत.

मिथुन रुग्णालयात दाखल. हे समजल्यानंतर त्याचे चाहते तणावात आहेत. आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि चाहत्यांसमोर पुन्हा नव्या जोमानं पुढे येतील.

हेही वाचा -

  1. मिस वर्ल्डसाठी भारतात येणाऱ्या स्पर्धकांच्या पाहुणचारासाठी मानुषी छिल्लर उत्साही
  2. 90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
  3. चित्तथरारक 'क्रॅक'चा ट्रेलर रिलीज, विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालची जबरदस्त अ‍ॅक्शन

Last Updated : Feb 10, 2024, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.