न्यूयॉर्क - Alia Bhatt Met Gala 2024: जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस 'फॅशन इव्हेंट मेट गाला 2024' सुरू झाला आहे. दरवर्षी हा फॅशन सोहळा मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा इव्हेन्ट न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथे भरवला जातो. दरम्यान बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्टनं मेट गालामध्ये तिची दुसरी हजेरी लावली आहे. आलियानं पारंपारिक लुकद्वारे अनेकांची मनं जिंकली. आलियानं देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पारंपरिक पेहराव निवडला. मेट गाला 2024 मधील आलिया भट्टचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती खूप देखणी दिसत आहे. तिच्या फोटोंच्या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, जगातील नामवंत लोक फॅशनचा सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रम साजरा करण्यासाठी मेट गालामध्ये दरवर्षी एकत्र जमत असतात.
आलिया भट्टचा लूक : या कार्यक्रमात अन्ना विंटोर, केंडल जेनर जेनिफर लोपेझ, ख्रिस हेम्सवर्थ, बॅड बनी, आणि बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टनं ग्रीन कार्पेटची शोभा वाढवली होती. आलियानं यावेळी सुंदर फ्लोरल सब्यसाची साडी नेसली होती. तिनं केस बनमध्ये बांधले आणि यावर माग टिका लावला होता. याशिवाय तिनं सुंदर असा लाईट मेकअप केला आणि लांब इयररिंग घातले होते. या वर्षीची मेट गालाची थीम 'स्लीपिंग ब्यूटीज़: रीवाकिंग फॅशन' आहे. एल्सा शियापरेली आणि ख्रिश्चन डायर सारख्या प्रतिष्ठित डिझायनर्ससह, हा कार्यक्रम फॅशनच्या इतिहासामधील भव्य असल्यानं आता अनेकांच्या नजरा यावर आहेत.
वर्कफ्रंट : झेंडाया, जेनिफर लोपेझ, ख्रिस हेम्सवर्थ आणि बॅड बनी सह-अध्यक्ष म्हणून मेट गालाचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये सेलिब्रिटींचे आगमन होताच सर्वांच्या नजरा 'गार्डन ऑफ टाइम' या संध्याकाळच्या अधिकृत ड्रेस थीमवर खिळल्या होत्या. ग्रीन कार्पेटवर प्रत्येक पावलावर, सेलिब्रिटींनी त्यांच्या जबरदस्त पोशाखांसह फोटोसाठी सुंदर पोझ दिली. दरम्यान आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामध्ये रणवीर सिंगबरोबर दिसली होती. आता पुढं ती 'मधुबाला', 'लव्ह अॅन्ड वॉर', 'इन्शाअल्लाह', 'जिगरा' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :