ETV Bharat / entertainment

फाऊंंटन सीनसाठी मनीषा कोईरालानं 12 तास घालवले पाण्याखाली, केली पोस्ट शेअर - Manisha Koirala

Manisha Koirala and Heeramandi : फाऊंंटन सीनसाठी मनीषा कोईरालाला 12 तास पाण्याखाली राहावं लागलं होतं, यानंतर हा सुंदर सीन शूट करण्यात आला होता. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Manisha Koirala and Heeramandi
मनीषा कोईराला आणि हिरामंडी ((Manisha Koirala instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 11:23 AM IST

मुंबई - Manisha Koirala and Heeramandi : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरीजमधील स्टारकास्ट सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. 53 वर्षीय मनीषा कोईरालानं अलीकडेच तिच्या गर्भधारणा आणि आरोग्याबाबत काही खुलासे केले आहेत. मनीषा कोईरालानं सांगितलं की, तिला कर्करोग आहे. दरम्यान, तिनं 'हिरामंडी'च्या एका सीनबाबत एक जबरदस्त खुलासा केला आहे. मल्लिकाजानच्या भूमिकेत मनीषा कोईरालानं तिच्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सध्या अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.

'हिरामंडी'मधील फाउंटन सीन : मनीषानं तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये खुलासा केला की, 'हिरामंडी'मधील एका सीनसाठी तिला 12 तास पाण्यात राहावं लागलं होतं. फाऊंंटनच्या सीन्सबद्दल बोलताना मनीषा सांगितलं की, "या सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 12 तास पाण्यात राहावं लागलं होतं. या सीदरम्यान ती खूप थकली होती. पुढं तिनं म्हटलं, "फाऊंंटन सीन माझ्यासाठी खूप कठीण सीन होता. यासाठी मला 12 तासांपेक्षा जास्त काळ पाण्याच्या कारंज्यात बुडून राहावे लागले. संजयनं विचारपूर्वक मला हा सीन करायला दिला होता, आधीच पाणी गरम आणि स्वच्छ होते, पण काही तासांतच ते पाणी घाण झालं. शूटिंग संपून मी थकले, तरी मनापासून आनंद वाटत होता. माझ्या शरीरानं प्रत्येक त्रास सहन केला. मला माहित आहे की मी खूप कठीण परीक्षा उत्तीर्ण केली."

'हीरामंडी'ची कहाणी : मनीषा कोईरालाची ही नवीन पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. आता तिची प्रशंसा अनेकजण करत आहे. 'हीरामंडी'च्या कहाणीबद्दल सांगायचं झालं तर, ही वेब सीरीज ब्रिटीश काळात भारतातील लाहोरमधील गणिकांच्या आयुष्यावर आधारित आहे, जे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढतात. या वेब सीरीजच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान, शर्मीन सहगल, रिचा चढ्ढा, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

  1. विकी कौशल सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - Zara Hatke Zara Bachke
  2. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - anushka sharm
  3. आईची भूमिका साकारून 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर केलं राज्य - mothers day 2024 special

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.