ETV Bharat / entertainment

अरहानच्या 'डंब बिर्याणी' व्होडकास्टमध्ये मलायका अरोरा सामील, बोल्ड विधानांमुळे होतेय टीका - Malaika Arora

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 3:07 PM IST

मलायका अरोराचा मुलगा अरहान खान त्याच्या व्होडकास्ट 'डंब बिर्याणी'च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. एपिसोडचा टीझरमध्ये अरहान आईला विचारतो की ती कधी लग्न करणार आहे?

Malaika Arora
मलायका अरोरा आणि अरहान खान

मुंबई - मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान सध्या 'डंब बिर्याणी' या व्होडकास्टचा होस्ट म्हणून काम करतोय. मर्यादित एपिसोड असलेल्या या शोची सुरुवात त्याने चुलता सलमान खानसह केली होती. अरहानच्या या डंब बिर्याणी शोमध्ये अनेक सेलेब्रिटी येतील अशी आशा आहे. दरम्यान, अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली त्याची आई मलायका अरोरा या शोमध्ये झळकणार आहे. व्होडकास्टच्या अधिकृत पेजवर अरहानने मलायकाबरोबरच्या व्हिडिओ चॅट शोची एक झलक शेअर केली होती. यामध्ये आई मलायका आणि तिचा मुलगा अरहान प्रेमातील जवळीक, लग्न आणि इतर विषयांवर चटपटीत गप्पा मारताना दिसू शकतात.

मलायका अरोरा आणि तिचा माजी पती अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान त्याच्या 'डंब बिर्याणी' या शोच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. आगामी एपिसोडमध्ये, त्याची आई मलायका अरहानच्या व्होडकास्टमध्ये दिसणार आहे. हा भाग आज बुधवारी रात्री ८ वाजता प्रसारित होईल.

'डंब बिर्याणी'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये, अरहानने मलायकाला प्रश्न केला की ती "सोशल क्लाइंबर" आहे का, यावर तिनं उत्तर दिले की, 'नाही'. मग तो म्हणाला, "माझा पुढचा प्रश्न आहे, "आई, तू कधी लग्न करणार आहेस?" यावर मलायकाने अरहानची खिल्ली उडवताना म्हटले, "तुला वाटतं की तू सत्यवादी आहेस? कारण मी खूप स्पायसी असू शकते." हा प्रोमो प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक युजर्सना अरहानाने आईला विचारलेला प्रश्न आवडलेला नाही. अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे.

अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा 2002 मध्ये जन्मलेला एकुलता एक मुलगा आहे. मलायका आणि अरबाजचे 2016 पर्यंत 19 वर्षे लग्न टिकले होते. 2017 मध्ये त्यांनी अधिकृत घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अरबाजने शशुरा खानसोबत लग्न केले. याउलट, मलायका आता बऱ्याच दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरबरोबर डेटिंग करताना दिसत आहे.

मलायका अरोरा तिच्या रिअ‍ॅलिटी प्रोग्राम्ससाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत, तिने 'जरा नचके देखा', 'झलक दिखला जा', 'नच बलिये' आणि 'इंडियाज बेस्ट डान्सर' यासारख्या काही नृत्य स्पर्धांसाठी जज म्हणून काम केले आहे. तिने 'सुपरमॉडेल ऑफ द इयर' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोचीही ती जज म्हणून काम केलं आहे.

हेही वाचा -

  1. विद्या बालननं सांगितला 'दो और दो पांच'च्या शीर्षकाचा किस्सा, फुल्ल टू धमाल कॉमेडी करायची व्यक्त केली इच्छा! - Vidya Balan interview
  2. शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty
  3. अनुष्का बाळासह भारतात परतली, पापाराझींपासून दूर ठेवला मुलांचा चेहरा - Anushka Sharma

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.