ETV Bharat / entertainment

तब्बल सात वर्षांनी सलमाननं घेतली 'एक्स वहिनी' मलायकाची भेट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan met Malaika Arora - SALMAN KHAN MET MALAIKA ARORA

Salman Khan met Malaika Arora: सलमान खाननं त्याचा भाऊ अरबाज खानच्या पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराची सांत्वनपर भेट घेतली. नुकतंच मलायकाचं पितृछत्र हरपलं. मलायकाच्या कठीण काळात धीर देण्यासाठी 'भाईजान' गुरुवारी रात्री उशिरा तिच्या आईच्या घरी पोहोचला. सलमानच्या आधी मलायकाला भेटायला आलेली गौरी खानही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

Salman Khan met Malaika Arora
सलमान खान मलायका अरोराला भेटला (सलमान खान (ANI-IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 13, 2024, 11:35 AM IST

मुंबई - Salman Khan met Malaika Arora : मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार्स तिच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत. मलायकाच्या आईच्या घरी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी भेट देत आहेत. मलायका आणि तिच्या कुटुंबीयांवर बुधवार 11 सप्टेंबर रोजी दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या कठीण काळात मलायका अरोराच्या आईच्या घरी आता सलमान खाननं भेट दिली. गुरुवारी, 12 सप्टेंबरला सलमान खान कडेकोट बंदोबस्तात सलमान आपला भाऊ अरबाजच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला धीर देण्यासाठी पोहोचतला. दोघं सात वर्षांच्या कालखंडानंतर एकमेकांना भेटले असल्याची चर्चा आहे.

सलमान खान भेटला मलायका अरोराला : सलमान खानच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य अरोरा कुटुंबाला धीर देण्यासाठी पोहोचले. अनिल मेहता यांच्या मृत्यूनंतर मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खाननं घटनास्थळी पोहचून पोलिसांबरोबर संवाद साधला होता. यानंतर सोहेल खान, सलीम खान, सलमान खानची आई सलमा, अर्पिता, अलविरा आदी सदस्यदेखील मलायकाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले. मलायका आणि अरबाज विभक्त झाल्यानंतर सलमान मलायकावर रागवला असल्याची चर्चा होती. त्यात अर्जुन कपूरबरोबरच्या मलायकाच्या जवळीक त्याला खटकत होती, अशीही चर्चा आहे. मात्र मलायकाचं पितृछत्र हरपल्यानंतर सलमान तिला भेटायला गेल्यामुळे सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा होत आहे. घटनास्थळावरून 'भाईजान'चे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सलमान खान त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.

अनिल मेहता यांचं निधन : व्हिडिओमध्ये सलमान खान निळ्या रंगाची जीन्स आणि कॅज्युअल नेव्ही-ब्लू शर्टमध्ये आहे. याशिवाय त्याच्याबरोबर त्याचे काही बॉडीगार्ड देखील आहेत. व्हिडिओत सलमान खानच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसते. 2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाबरोबर सलमानची ही पहिलीच भेट आहे. खान फॅमिली अनेकदा मलायकाबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी स्पॉट झाली आहे, मात्र त्या कार्यक्रमांमध्ये मलायकाबरोबर सलमान कधीच दिसला नाही. दुसरीकडे सलमान खानपूर्वी शाहरुख खानची पत्नी गौरी खानही मलायकाच्या आईच्या घरी जाताना दिसली होती. मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचं 11 सप्टेंबर रोजी निधन झालं. यानंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं त्यांनी नमूद केलं. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सध्या पोलीस आणि गुन्हे शाखा पथक या प्रकरणाचा बारकाईनं तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी अरबाज खान पत्नी शूराबरोबर पोहोचला, व्हिडिओ व्हायरल - Malaika Arora
  2. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठिशी खंबीर - arjun kapoor
  3. सोन्यासारख्या दोन मुली असताना केली आत्महत्या, मलायका आणि अमृताचे वडील अनिल मेहता यांनी जीवन संपवलं - ANIL ARORA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.