ETV Bharat / entertainment

माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे'मध्ये सीरियल किलरची भूमिका साकारेल?, वाचा सविस्तर - Madhuri Dixit - MADHURI DIXIT

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित तिच्या आगामी 'मिसेस देशपांडे'मध्ये सीरियल किलरची भूमिका साकारणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. आता या नवीन भूमिकेत तिला पाहण्यासाठी तिचे चाहते देखील आतुर आहेत.

Madhuri Dixit
माधुरी दीक्षित (माधुरी दीक्षित (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 6:19 PM IST

मुंबई - Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितला आपण अनेकदा मोठ्या पडद्यावर हलक्याफुलक्या भूमिका साकारताना पाहिलं आहे. अनेकांना तिचा अभिनय खूप आवडतो. आता मिळालेल्या माहितीनुसार ती सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये माधुरी सीरियल किलरच्या भूमिकेत असणार आहे. माधुरी दीक्षितनं गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टीव्ही रिॲलिटी शो आणि वेब शोमध्ये काम करून प्रेक्षकांमध्ये तिनं एक विशेष ओळख निर्माण केली आहे.

माधुरी दीक्षित दिसणार सीरियल किलरच्या भूमिकेत : नागेश कुकुनूर दिग्दर्शित सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये सीरियल किलरच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितबरोबर सध्या चर्चा सुरू आहेत. या शोचे नाव, 'मिसेस देशपांडे' असणार आहे. या शोची कहाणी खूपच रंजक असेल, यात पोलीस एका सीरियल किलरला पकडण्यासाठी दुसऱ्या सीरियल किलरची नियुक्ती करतात. हा शो फ्रेंच वेब सीरीजचा रिमेक आहे. सध्या शोचे कास्टिंग सुरू आहे. माधुरीला डार्क रोलमध्ये सादर करण्यासाठी शोची टीम खूप उत्सुक आहे. आता माधुरीचे चाहते देखील तिला सीरियल किलरच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

माधुरी दीक्षितचं वर्कफ्रंट : माधुरीला 'डान्स दिवाने 4' या लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोमध्ये शेवटी जज म्हणून पाहिलं गेलं होतं. हा शो देखील खूप हिट झाला होता. याशिवाय ती 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालन आणि कार्तिक आर्यनबरोबर दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, राजपाल यादव , विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा आणि इतर कलाकारांच्या विशेष भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, सिने वन स्टुडिओ करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. आता माधुरीचे चाहते तिच्या या चित्रपटाच्या रिलीजची देखील खूप वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. 'ऑल आइज ऑन रफाह'ला आधी पाठिंबा देऊन पोस्ट डिलीट केल्याबद्दल माधुरी दीक्षित झाली ट्रोल - All Eyes on Rafah
  2. माधुरी दीक्षितची सुनील शेट्टीपासून करिश्मा कपूरपर्यंत 'धक धक' वाढवणारी रील्स - Madhuri Dixit birthday
  3. माधुरी दीक्षितच्या चाहत्यानं मतदारांना जागरुक करत अनोख्या पद्धतीनं साजरा केला वाढदिवस - Madhuri Dixit birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.