ETV Bharat / entertainment

माधुरी दीक्षितसह रितेश देशमुखनं गुढीपाडव्याच्या दिल्या शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल - MADHURI DIXIT AND RITEISH DESHMUKH - MADHURI DIXIT AND RITEISH DESHMUKH

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा हा सण आज ९ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर या विशेष प्रसंगी माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Gudi Padwa 2024
गुढीपाडवा 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 1:17 PM IST

Updated : Apr 9, 2024, 4:01 PM IST

मुंबई - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण सर्वसामान्यांमध्येच नाही तर चित्रपटसृष्टीतही जल्लोषानं साजरा केला जात आहे. बी-टाऊनचे सेलिब्रिटी आज 9 एप्रिल रोजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. रितेश देशमुख, माधुरी दीक्षित आणि इतर सेलिब्रिटींनीही त्यांच्या चाहत्यांबरोबर गुढीपाडव्याची खास झलक शेअर केली आहे. मंगळवारी माधुरी दीक्षितनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर गुढीपाडव्याचा व्हिडिओ शेअर केला. माधुरीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.'' या खास प्रसंगी तिनं महाराष्ट्राच्या पद्धतीनं साडी घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहेत. याशिवाय तिनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण तिला या विशेष दिवसाच्या शुभेच्छादेखील देत आहेत.

माधुरी आणि रितेशचा व्हिडिओ व्हायरल : माधुरीचे अनेक चाहते तिच्या महाराष्ट्रीयनं लूकचं कौतुक करताना दिसत आहेत. माधुरीनं या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिनं सोन्याचे दागिने घातले आहेत. याशिवाय तिनं कपाळावर टिकली लावली आहे. पारंपारिक लूकमध्ये माधुरी खूप हटके दिसत आहे. दुसरीकडे रितेश देशमुख एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो आपल्या मुलांबरोबर पूजेची तयारी करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. अनेकजण रितेश कौतुक करत आहे. मराठी संस्कृती जपत असल्याचं चाहत्यांनी कमेंट्स करून म्हटलं आहे.

रितेश आणि माधुरीचं वर्कफ्रंट : रितेशच्या या पोस्टवर एकानं लिहिलं, ''रितेश आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलांना खूप चांगले संस्कार देत आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, '' रितेशचे मुलं प्रत्येक सण खूप आनंदाने साजरे करतात.'' आणखी एकानं लिहिलं, '' रितेश तुझी मुले खूप सुंदर दिसत आहे.'' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान माधुरी आणि रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती 'मजा मा' चित्रपटामध्ये दिसली होती. दुसरीकडे रितेश हा 'राजा शिवाजी', 'हाऊसफुल ५', 'मस्ती ४', 'विस्फोट' आणि 'रेड 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training
  2. नयनतारानं नवीन ऑफिसचे फोटो शेअर करत टीमचे मानले आभार - Nayanthara
  3. संजय दत्त कोणती पॉलिटिकल पार्टी जॉईन करणार का?, पोस्टसह केला खुलासा - Sanjay Dutt

Last Updated : Apr 9, 2024, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.