ETV Bharat / entertainment

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं 'लव स्टोरिया' वेब सीरीजचा ट्रेलर केला रिलीज - करण जोहर

Love Storiyaan trailer : चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं 'लव स्टोरिया' वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही वेब सीरीज खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

Love Storiyaan trailer
लव स्टोरिया ट्रेलर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 2:40 PM IST

मुंबई - Love Storiyaan trailer : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांना आदर्श मानणाऱ्या करण जोहरनं अनेक हिट चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले आहेत. करणचे रोमँटिक चित्रपट अनेकांना आवडतात. आता त्यानं 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. करणनं 'लव स्टोरिया' वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज केला आहे. या वेब सीरीजमधून प्रेक्षकांना 6 खऱ्या प्रेमकहाण्या पाहायला मिळणार आहेत. या वेब सीरीजच्या ट्रेलरमध्ये करण जोहर स्वतः दिसत आहे. या ट्रेलरमध्ये करण 'प्रेमा'ची व्याख्या सांगताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लव्ह स्टोरीज' ट्रेलर प्रदर्शित : या वेब सीरीजच्या ट्रेलरमध्ये करण म्हणतो, ''प्रेम हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यानंतर, वेब सीरीजचा ट्रेलर सुरू होतो, ज्यामध्ये 6 जोडपी त्यांच्या प्रेमकथेबद्दल खुलासा करताना भावूक होताना दिसत आहेत. ही सर्व जोडपी पहिल्या भेटीपासून ते लग्नाचा प्रस्ताव आणि लग्नापर्यंत आलेल्या सर्व अडचणी सविस्तरपणे सांगताना दिसत आहेत. 'लव्ह स्टोरीज'या वेब सीरीजचे दिग्दर्शन हार्दिक मेहता, विवेक सोनी, शाझिया इक्बाल, राहुल बडवेलकर, अक्षय इंडीकर, अर्चना फडके, कॉलिन जे कुन्हा यांनी केलं आहेत. याशिवाय या सर्वांनी मिळून वेब सीरीजची कहाणी देखील लिहिली आहेत. या वेब सीरीजचे निर्माते सोमेन मिश्रा आहेत आणि ही वेब सीरीज धर्मा प्रोडक्शन्स च्या बॅनरखाली बनवली जात आहे.

'लव्ह स्टोरीज'बद्दल : या वेब सीरीजमध्ये निशान एन पुथुसेरी, निकोलस जोनाथन खरमेनी, राजकी कार्की छेत्री, फरीदा साहा, सुभद्रा खापेर्डे, सुनीत कुमार साहा, राहुल बॅनर्जी,सोम्यजित घोष दस्तीदार, हुमायून खोरम, तीस्ता दास आणि दीपन चक्रवर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होईल. करण जोहरनं शेअर केलेल्या ट्रेलरवर अनेकजण कमेंट्स करून या आगामी वेब सीरीजसाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. विराट कोहलीची नक्कल करताना शाहिद कपूरचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
  2. दीपिका पदुकोणने विमानतळावर दाखवली, 'वेड्या बहिणीची वेडी माया'
  3. हृषिकेश मुखर्जींच्या 'बावर्ची'चा होणार रिमेक, अनुश्री मेहतावर दिग्दर्शनाची जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.