ETV Bharat / entertainment

वयाच्या 13व्या वर्षी वडील गमावले, केवळ 25 रुपये होती पहिली कमाई! अशा घडल्या 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर - लता मंगेशकर पुण्यतिथी

Lata Mangeshkar Death Anniversary : 36 भाषांमध्ये 50 हजाराहून अधिक गाणी गाणाऱ्या लताजींचं बालपण अत्यंत संघर्षमय होतं. त्यांच्या बालपणीच वडिलांचं निधन झालं. मात्र तरीही जिद्द आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या लता मंगेशकर यांचा 'गानसम्राज्ञी' बनण्याचा प्रवास..

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 9:20 AM IST

मुंबई Lata Mangeshkar Death Anniversary : 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर जरी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शतकानुशतकं स्मरणात राहील. त्यांनी आपल्या कारकिर्दीत असा टप्पा गाठला आहे, ज्याची पुनरावृत्ती करणं कोणत्याही कलाकारासाठी जवळपास अशक्यच! लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये सुमारे 50 हजाराहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. आज (6 फेब्रुवारी) त्यांची दुसरी पुण्यतिथी. 2022 मध्ये त्यांनी आजच्याच दिवशी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बालपणीच वडिलांचं निधन झालं : लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचंं बालपण संघर्षमय होतं. त्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. लताजींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना गायनाच्या दुनियेत आणलं. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. आपल्या भावा-बहिणींच्या शिक्षणासाठी त्या स्वतः अभ्यासापासून दूर राहिल्या.

गुलाम हैदर यांनी पहिला ब्रेक दिला : आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लताजींनी मराठी संगीत नाटकांमध्ये काम केलं. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून विविध कार्यक्रमांमध्येही भाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्या चित्रपटांमध्ये गाणी गायला लागल्या. संगीतकार गुलाम हैदर यांनी लतादीदींना पहिला ब्रेक दिला. मात्र, फाळणीनंतर ते लाहोरला गेले. 'मजबूर' या 1948 सालच्या चित्रपटातील 'दिल मेरा तोडा' या गाण्यासाठी त्यांनी लतादीदींना आवाज देण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी हे गाणे खूप गाजलं आणि त्यानंतर लतादीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

पहिली कमाई 25 रुपये : लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 'पहिली मंगळागौर' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. त्यांची पहिली कमाई 25 रुपये होती. यानंतर लताजींनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आणि अनेक विश्वविक्रम रचले. लता मंगेशकर यांनी आमिर खानच्या 'रंग दे बसंती' चित्रपटातील 'लुका छुपी' या गाण्याला शेवटचा आवाज दिला. 2006 मध्ये रिलिज झालेल्या या गाण्यानं आई-मुलाच्या नात्याला नवी व्याख्या दिली आहे. आजही लोक या गाण्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात.

भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित : संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल लताजींना अनेक सन्मान मिळाले आहेत. 1970 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा 'फिल्मफेअर पुरस्कार' आणि 1972 मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. लताजींना 1989 मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कार, तर 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला.

फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला : 2007 मध्ये, फ्रान्स सरकारनं लता मंगेशकर यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' देऊन गौरव केला. याशिवाय, सप्टेंबर 2019 मध्ये 90व्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारनं त्यांना 'डॉटर ऑफ द नेशन' पुरस्कारानं सन्मानित केलं. आज लताजींच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे.

हे वाचलंत का :

  1. Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर या सात शब्दातच सामावली होती संगीताची जादू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.