ETV Bharat / entertainment

फिल्म फेडरेशनच्या निवेदनावर 'लापता लेडीज'च्या लेखिका स्नेहा देसाई नाराज - Laapataa Ladies

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 8 hours ago

Laapataa Ladies in Oscar 2025 : 'लापता लेडीज' चित्रपटाच्या पटकथा लेखिकेनं ऑस्कर 2025 मध्ये चित्रपटाच्या अधिकृत प्रवेशानंतर केलेल्या निवड समितीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. फिल्म फेडरेशनचं हे विधान वाचनीय नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

Sneha Desai
स्नेहा देसाई (Sneha Desai photo ANI and Etv Bharat)

मुंबई - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपटाला भारताकडून ऑस्कर 2025 चे नामांकन मिळाले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. असं असलं तरी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीमध्ये एकही महिला सदस्य नाही. शिवाय ही निवड केल्यानंतर एफएफआयनं दिलेल्या संक्षिप्त निवदेनात चित्रपटातील संदेशाबाबत व्यस्त विधान करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या विधानाची खिल्ली अनेकांनी उडवली होती. याबाबत 'लापता लेडीज' या चित्रपटाच्या पटकथा लेखिका स्नेहा देसाई म्हणतात की, ऑस्कर 2025 मध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून चित्रपटाची निवड करण्यासाठी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) दिलेल्या निवदेनातील मजकूर वाचनीय वाटत नाही.

एफएफआयच्या विधानावर स्नेहा देसाईंचा आक्षेप -

स्नेहा देसाई म्हणाल्या की, दरवर्षी आंतरराष्ट्रीय श्रेणीमध्ये ऑस्करसाठी भारताच्या चित्रपटाची निवड करीत असलेल्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ( FFI ) च्या 13 सदस्यीय ज्युरीमध्ये एकही महिला नाही. याशिवाय सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपटाबद्दल जे लिहिले आहे ते चित्रपटात दाखवलेल्या संदेशापेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचं सांगितलं आहे.

एफएफआयने काय लिहिले आहे?

आता प्रश्न पडतो की एफएफआयने काय लिहिले आहे? - एफएफआयनं लिहिलंय की- भारतीय महिला म्हणजे अधीनता आणि वर्चस्व यांचे विचित्र मिश्रण आहे. सु-परिभाषित, शक्तिशाली पात्रांनी भरलेल्या जगात, 'लापता लेडीज' ही विविधता जरी कमी आदर्श आणि मजेदार मार्गाने असली तरी उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. देसाई यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आणि या विधानावर फारशी वाच्यता करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगितले.

ऑस्कर 2025 साठी या चित्रपटाची निवड झाल्यानं स्नेहा देसाई खूश -

स्नेहा देसाई यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ग्रामीण भारतावर आधारित हा नाट्यमय कथानक लिहिले. भारतातर्फे ज्युरीमध्ये एकही महिला सदस्य नसतानाही हा चित्रपट जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे याचा आनंद वाटत असल्याचं देसाईंनी म्हटलंय.

स्नेहा देसाई म्हणाल्या की, 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'लापता लेडीज' चित्रपटाचा भारताकडून प्रवेश निश्चित झाल्याची बातमी आल्यापासून कलाकार आणि क्रू यांना कॉल आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत.

'लापता लेडीज' या चित्रपटामध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्याबरोबर रवी किशन, छाया कदम आणि गीता अग्रवाल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आमिर खानची माजी पत्नी आणि चित्रपट निर्माता किरण राव यांनी याचे दिग्दर्शन केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.