मुंबई - Sandeep Reddys Animal : चित्रपट निर्माती दिग्दर्शिका आणि आमिर खानची माजी पत्नी किरण रावनं तिला संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केलीय. अलिकडे एका मुलाखीत तिनं याबद्दलचा खुलासा केला. किरण म्हणाली की, "असा चित्रपट पाहण्याची हिंमत माझ्यात नाही परंतु तो चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला असेल तर ते जाणून घेण्यासाठी मला तो पाहायचा आहे."
'लापता लेडीज'ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल बोलताना किरणने सांगितले की समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही हा चित्रपट आवडला ही गोष्ट असामान्य आहे. प्रेक्षक मनोरंजक, अॅक्शन फिल्मस यांना प्राधान्य देतात, पण समीक्षकांचे तसे नसते, असेही किरणने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. तिचा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही आवडला याचा तिला आनंद झाला आहे.
ती म्हणाली, "लापता लेडीजला खूप प्रेम मिळाले आहे, यासाठी मी कृतज्ञ आहे. समीक्षकांनाही तो आवडला आहे. जेव्हा प्रेक्षकांना एखादा चित्रपट आवडतो, तेव्हा समीक्षकांना तो आवडेलच असं नाही. प्रेक्षकांना अॅक्शनपॅक्ड, भरपूर मसाला आणि व्हीएफएक्सची चमक असलेले 'अॅनिमल'सारखे चित्रपट आवडतात. मलाही 'अॅनिमल' चित्रपट पाहायचा आहे. तो खूप चांगला झाला आहे कारण लोकांना तो आवडला आहे. मी ऐकले आहे की संदीप रेड्डी वंगा यांच्याकडे ही कला खरोखर चांगली आहे. रणबीर कपूरदेखील एक चांगला अभिनेता आहे. माझ्यासाठी हा चित्रपट पाहणे मनोरंजक असेल, लोकांनाही तो चित्रपट खूप आवडलाय."
गेल्या वर्षी एका चर्चा सत्रात बोलताना किरण रावने लिंग संवेदनाबाबत वकिली केली होती. यासाठी तिने एका भारतीय संस्थेने केलेल्या अभ्यासाचा हवाला दिला होता. या अभ्यासात असे आढळून आले की , स्क्रीनवरील आणि बाहेरील दोन्ही, महिला आणि ट्रान्सजेंडर्सचे चित्रण बहुतेक रूढीवादी होते. 'स्टॉकिंगचा गौरव करणारे चित्रपट कमालीचे चांगले काम करतात' याचे उदाहरण म्हणून तिने कबीर सिंगचा उल्लेख केला होता.
तिच्या या उद्गाराबाबत संदिप सिंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, "जा आणि आमिर खानला विचार की 1990 च्या त्याच्या 'दिल' चित्रपटात त्याने किती आचरट गाणे आणि संवाद बोलले होते. यादरम्यान आमिरची एक जुनी माफी देखील व्हायरल झाली होती. यात तो म्हणाला होता की, 'महिलांना चांगले चित्रित न करणाऱ्या बेजबाबदार चित्रपटांचा एक भाग असल्याची मला लाज वाटते."
त्यानंतर किरणने दुसऱ्या एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले होते की, तिने संदीपच्या चित्रपटावर कुठलेही भाष्य केलेलं नाही. ती म्हणाली की याविषयावर आमिरनं माफी मागितली आहे. मात्र ती त्याच्या कामासाठी जबाबदार नाही.
हेही वाचा -