ETV Bharat / entertainment

कियारा अडवाणीच्या 33व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची पहिली झलक, फोटो व्हायरल - kiara advani - KIARA ADVANI

Kiara Advani 33rd Birthday Celebration : कियारा अडवाणीचा आज वाढदिवस आहे. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये ती केक कापताना दिसत आहे.

Kiara Advani 33rd Birthday Celebration
कियारा अडवाणीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन (कियारा अडवाणीचा बर्थडे (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 5:48 PM IST

मुंबई - Kiara Advani 33rd Birthday Celebration : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी आज 31 जुलै हा दिवस खूप विशेष आहे. या दिवशी कियारा तिचा वाढदिवस साजरा करत असून तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज कियारा 33 वर्षांची झाली आहे. सकाळपासून चाहते आणि सेलिब्रिटी कियाराला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान कियारा अडवाणीनं तिच्या इन्स्टास्टोरीवर शुभेच्छा स्टेटस पोस्ट करून तिच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कियाराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

कियारा अडवाणीला दिल्या स्टार्सनं शुभेच्छा : कियाराच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या सुंदर फोटोंवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बर्थडे सेलिब्रेशनच्या झलकमध्ये कियारा क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चॉकलेट केक आणि फुलांबरोबर, कियाराच्या शेजारी भेटवस्तू ठेवल्या आहेत. आता कियाराच्या फोटोंवर चाहते काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच बॉलिवूड स्टार्सनमध्ये कियाराला शाहिद कपूर, हुमा कुरेशी, मनीष मल्होत्रा, भूमी पेडणेकर, अथिया शेट्टी, मनीष पॉल, जॅकी भगनानी, रकुल प्रीत, परिणीती चोप्रा, मलायका अरोरा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्रानं देखील सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा सुंदर फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह, हा फोटो हे सर्व सांगते. माझ्या माहितीमधील तू सर्वात दयाळू व्यक्ती आहेस."

कियाराच्या आगामी चित्रपटांबद्दल: कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचे तीन मोठे चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. तिचा पहिला चित्रपट साऊथ स्टार राम चरणबरोबरचा 'गेम चेंजर' आहे. या चित्रपटामधील आजच निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय ती यशराज स्पाय युनिव्हर्स चित्रपट 'वॉर 2'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआर, जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन हे दिसणार आहेत. तिसरा चित्रपट म्हणजे, कियाराचा रणवीर सिंग स्टारर 'डॉन 3' असणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. 'गेम चेंजर' निर्मात्याकडून पोस्टर रिलीज, कियारा अडवाणीला शुभेच्छा देत उघड केले 'ते' गुपीत - KIARA ADVANI
  2. सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला 50 लाखाचा झटका, कियारा अडवाणीमुळे अभिनेत्याचा जीव धोक्यात - Sidharth Malhotra
  3. कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.