ETV Bharat / entertainment

Katrina kaif latest Photo : कटरिना कैफच्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांनी केली कौतुकाचा वर्षाव - Katrina kaif latest Photo

Katrina kaif latest Photo : हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री कतरिना कैफनं इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सोज्वळ दिसत आहे.

Katrina kaif latest Photo
कतरिना कैफचा लेटेस्ट फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 3:27 PM IST

मुंबई - Katrina kaif latest Photo : हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच दिग्गज अभिनेत्री आई झाल्या आहेत. अलीकडेच दीपिका पदुकोणनं गरोदरपणाची घोषणा करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता आनंदाच्या बातमीमुळे रणवीर सिंग आणि दीपिकाचे चाहते खूप खुश आहेत. दीपिकानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण तिला काळजी घेण्याचा सल्ला आणि शुभेच्छा दिल्या होत्या. आता चाहत्यांचं लक्ष कतरिना कैफवर आहे. ती कधी गुडन्यूज देईल याची वाट अनेकजण पाहात आहेत. 13 मार्च रोजी कतरिनानं सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर कतरिनाचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

कतरिनानं शेअर केला फोटो : कतरिना कैफनं फोटोत बहुरंगी ड्रेसवर मस्टर्ड जॅकेट घातलं आहे. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. कतरिना कैफनं तिच्या या सुंदर फोटोबरोबर काउबॉय इमोजी शेअर केला आहे. कतरिनाचा हा फोटो एक लाखाहून अधिक चाहत्यांनी लाइक केला आहे. एका चाहत्यानं या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ''खूप सुंदर, सोज्वळ, अगदी वॉव दिसत आहे.'' आणखी एका चाहत्यानं या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''कतरिना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर चाहते करताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहे.

कतरिना कैफ वर्कफ्रंट : कतरिना कैफनं अभिनेता विकी कौशलबरोबर राजस्थानमध्ये 9 डिसेंबर 2021 रोजी शाही पद्धतीनं लग्न केलं. चालू वर्षात कतरिना कैफच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान कतरिना नुकतीच ' मेरी ख्रिसमस' या चित्रपटामध्ये विजय सेतुपतीबरोबर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. आता पुढे ती कार्तिक आर्यनबरोबर 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा एक स्पोर्ट ड्रामा चित्रपट आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटावर काम सुरू होत असल्याचं समजत आहे.

हेही वाचा :

  1. War 2 viral pics : 'वॉर 2'च्या सेटवरील हृतिक रोशनचे फोटो लीक
  2. Margaon Express : "ते माझ्या हृदयाच्या जवळचे लोकेशन होते": 'मडगाव एक्स्प्रेस' गोव्यातच का शूट केले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
  3. Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकणार लग्नबेडीत; पाहा लग्नामधील विधीचा तपशील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.