ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल प्रदर्शित - KARTIK AARYAN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 10:30 AM IST

Chandu Champion OTT Release : कार्तिक आर्यन अभिनीत 'चंदू चॅम्पियन' काही दिवसांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचं समजत आहे. आता हा चित्रपट कुठल्या प्लॅटफॉर्मवर दिसणार याबद्दल जाणून घ्या...

Chandu Champion OTT Release
चंदू चॅम्पियन ओटीटी रिलीज ((Kartik aaryan instagram))

मुंबई- Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे. कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर 'चंदू चॅम्पियन'नं अपेक्षेप्रमाणे कमाई केली नसली तरी, या चित्रपटामधील कार्तिकच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे. आता चाहतेही या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ओटीटीवर 'चंदू चॅम्पियन' कुठे रिलीज होईल? : नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत साजिद नाडियादवाला निर्मित, 'चंदू चॅम्पियन' हा कार्तिक आर्यनचा उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या प्रेरणादायी कहाणीवर आधारित आहे. कार्तिकनं या चित्रपटासाठी स्वत:च्या बॉडीमध्ये खूप परिवर्तन केलं होतं. आता अनेकजण 'चंदू चॅम्पियन'ची ओटीटी रिलीजची वाट पाहात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट ॲमेजन प्राईम व्हिडियोवर प्रदर्शित होणार आहे. 'चंदू चॅम्पियनचे अधिकृत हक्क ॲमेजन प्राईमनं विकत घेतले आहेत.

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची स्टार कास्ट : दरम्यान 'चंदू चॅम्पियन'च्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा आणि अचूक प्रीमियरची तारीख अद्याप निर्मात्यांनी घोषित केलेली नाही. 'चंदू चॅम्पियन' स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आता पुढे तो विद्या बालनबरोबर 'भूल भुलैया 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी देखील असणार आहे. या चित्रपटाची चाहते सध्या खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.