मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 Shooting Video : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'रूह बाबा' कार्तिक आर्यननं 9 मार्चच्या पहाटे एक फोटो शेअर केला होता आणि सांगितलं होतं की तो 'भूल भुलैया 3'चं शूटिंग सुरू करणार आहे. याशिवाय कार्तिकनं देवासमोर हात जोडून स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानं 'भूल भुलैया 3'साठी देवाला आर्शीवाद मागितला होता. दरम्यान आज 'भूल भुलैया 3'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनीस बझ्मी यांच्यासह कार्तिक आर्यन, तृप्ती दिमरी आणि विद्या बालन हे स्टार्स दिसत आहेत. कार्तिक आर्यन, तृप्ती दिमरी, विद्या बालन व्हिडिओत शुटिंग सेटवर जाताना दिसत आहेत.
'भूल भुलैया 3'ची शूटिंग सुरू : 'भूल भुलैया 3' चित्रपट दिवाळी 2024 च्या विशेष मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी कार्तिक आर्यननं त्याच्या घरी पूजा केली होती. कार्तिकच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं त्यानं एका पोस्टव्दारे सांगितलं होत. या चित्रपटाचं दिग्दर्शनअनीस बझ्मी करणार आहेत. 'भूल भुलैया 3' चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अलीकडेच, कार्तिकनं 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती दिमरीचा 'भूल भुलैया 3' चित्रपटात प्रवेश निश्चित केला होता. कियारा अडवाणी ऐवजी तृप्ती दिमरी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
कार्तिक आर्यनचं वर्कफ्रंट : 'भूल भुलैया' फ्रँचायझीचा पहिला भाग हा रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता. या चित्रपटामध्ये विद्या बालनबरोबर अक्षय कुमार आणि शायनी आहूजा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. यानंतर दुसऱ्या भागात कार्तिक हा तब्बू आणि कियारा अडवाणीबरोबर दिसला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर झाला. आता 'भूल भुलैया' या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे. दरम्यान कार्तिक आर्यन वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं नुकतेच 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. याशिवाय तो दिग्दर्शकअनुराग बासूच्या आगामी 'आशिकी 3' चित्रपटातही काम करणार आहे.
हेही वाचा :