ETV Bharat / entertainment

पुष्पा चक्रीवादळाचा उद्रेक होणार : करण जोहरनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं केलं कौतुक - Pushpa song - PUSHPA SONG

Pushpa song : 'पुष्पा द रुल' चित्रपटातील पहिलं गाणं लॉन्च झाल्यानंतर सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं आहे. अल्लु अर्जुनच्या चाहत्यांच्या तर आनंदाला उधाण आलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरनंही गाण्याचं आणि अल्लु अर्जुनचं कौतुक केलंय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 10:40 AM IST

मुंबई - Pushpa song : 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतीक्षित चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' हे गाणं 1 मे रोजी रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर वादळ निर्माण झालं. हे गाणं, त्यातली अल्लु अर्जूनची स्टाईल आणि डान्स पाहून चाहत्यांना तर वेड लागणंच बाकी राहिलंय. गाण्यातील अल्लू अर्जुनच्या नृत्याने प्रभावित होऊन चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'पुष्पा 2' च्या गाण्याचं एक व्हिडिओ रील पोस्ट करत त्यावर लिहिले, "एक चक्रीवादळी रीलचा उद्रेक होणार."

Karan Johar appreciated Allu Arjun
करण जोहरनं अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं केलं कौतुक

गाण्याचे लॉन्चिंग झाल्यानंतर, अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर गाण्यात 'शू ड्रॉप स्टेप' करतानाची एक छोटी क्लिप शेअर केली. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "पुष्पा पुष्पा गाण्याचे हे शू ड्रॉप स्टेप शेअर करताना आनंद झाला."

'पुष्पा 2' चे निर्मिती बॅनर मैत्री मुव्हीज मेकर्सने गाण्याच्या व्हिडिओसह एक्स सोशल मीडिया हँडलवर गाणं लॉन्च केलं आणि पोस्टला कॅप्शन दिलं, "पुष्पपुष्पा मंत्राने पुष्पा राजच्या आगमनाचा जयजयकार करा."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पुष्पा पुष्पा' गाण्याच्या व्हिडिओमध्ये, पुष्पा राज उर्फ अल्लू अर्जुन एका हातात चहाचा ग्लास घेऊन स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. क्लिपचा शेवट पुष्पाच्या प्रतिष्ठित डायलॉग 'झुकेगा नही साला' आपल्या दाढीवरुन उलटा हात फिरवत स्टाईलमध्ये म्हणताना दिसतो.

संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद ज्यांनी 'पुष्पा १: द राइज' या चित्रपटातील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. त्यांनीच 'पुष्पा 2' साठी हा ट्रॅक पुन्हा तयार केला आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या इतर भाषेतील गाण्यासाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रंजित गोविंद आणि तिमिर बिस्वास या लोकप्रिय गायकांना सामील करून घेतले आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा राज उर्फ अल्लू अर्जुनच्या टीझरचे लॉन्चिंग केले होते. आपला वाढदिवस आणखी खास बनवत अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर टीझर शेअर केला होता आणि लिहिले होते, "वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुम्हा प्रत्येकाचे आभार मानतो! माझे मन कृतज्ञतेने भरले आहे. कृपया धन्यवाद म्हणून माझ्या स्टाईलने हा टीझर स्वीकारा. !"

'पुष्पा 2: द रुल' चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून त्यात रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्याही भूमिका आहेत. टीझरमध्ये अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत एका नवीन अवतारात दिसला आहे.

मैत्री मु्व्हीज मेकर्स निर्मित 'पुष्पा : द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला त्याच्या पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागात लाल चंदनाच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली संघर्ष दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा -

खळबळजनक! सलमान खान गोळीबार प्रकरणातल्या आरोपीनं लॉकअपमध्ये केली आत्महत्या, सीआयडी करणार चौकशी - Salman Khan shooting case

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा-द रुल'मधील पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' रिलीज, पाहा व्हिडिओ - First song Pushpa Pushpa Released

रजनीकांत स्टारर 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गमध्ये अनिरुद्ध रविचंदरची डान्स क्लिप लीक - vettaiyan Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.