ETV Bharat / entertainment

कंगना राणौतच्या झापड मारण्याच्या घटनेवर एक्स बॉयफ्रेंड अध्यायन आणि शेखर सुमननं दिली प्रतिक्रिया - KANGANA RANAUT SLAP ROW - KANGANA RANAUT SLAP ROW

Kangana Ranaut Slap Row : अभिनेत्री कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेंड अध्यायन सुमन आणि त्याचे वडील शेखर सुमनचा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कंगना राणौतच्या झापड मारण्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Kangana Ranaut Slap Row
कंगना राणौतचं झापड प्रकरण ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 4:12 PM IST

मुंबई - Kangana Ranaut Slap Row : अभिनेत्री कंगना राणौतच्या कानशीलात मारल्याचं प्रकरण तापलं आहे. कंगनाला अनेकजण पाठिंबा देत आहे. या प्रकरणात कंगना राणौतला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड अध्यायन सुमन आणि त्याचे वडील शेखर सुमन, अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर खेर हे आहेत. दरम्यान अध्यायन सुमनला कंगनाविषयी विचारे असता तो प्रश्न हा टाळताना दिसला आणि त्यानंतर त्याच्या वडीलांनी म्हटलं, "कुणाला कानशीलात मारणं हे चुकीचं आहे, त्या आता खासदार आहेत, जे काही झालं ते निषेधार्ह आहे, कुणाला विरोध करायचा असेल तर वेगळा मार्ग असू शकतो, हे पब्लिकली योग्य नाही."

कंगना राणौतनला झापड मारल्या प्रकरणी अधय्यन सुमननं दिली प्रतिक्रिया : यानंतर अध्यायन सुमन म्हटलं, "माझ्या वडीलांचं बोलणं अगदी बरोबर त्या महिलेनं तिचा वैयक्तिक राग सार्वजनिकपणे व्यक्त केला हे चुकीचं आहे." अध्यायन आणि शेखर 'हीरामंडी: द डायमंड बाजार'मध्ये शेवटी दिसले होते. ही वेब सीरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. या वेब सीरीजमध्ये शर्मीन सेगल, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, फरीदा जलाल, जयती भाटिया, ताहा शाह, फरदीन खान आणि इतर कलाकार दिसले होते. 'हीरामंडी: डायमंड बाजार' ही संजय लीला भन्साळी यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेली वेब सीरीज आहे. प्रचंड हिट झाल्यांतर आता या वेब सीरीजचा दुसरा पार्ट येणार आहे.

कंगना राणौतचं प्रकरण : 6 जून रोजी कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीला रवाना झाली आणि चंदीगड विमानतळावर सीआयएकएफ (CISF)च्या महिला कॉन्स्टेबलनं तिला कानशीलात लगावली. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरनं कंगनाला मारल्याचं कारण तिचे वादग्रस्त विधान असल्याचं सांगितलं गेलं आहे. कुलविंदरनं दावा केला की तिची आई आणि अनेक महिलांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला होता आणि कंगनानं सांगितलं होतं की या महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसल्या होत्या. आता कंगना राणौतची झापड मारण्याची घटना देशभर गाजत आहे.

हेही वाचा :

  1. रामोजी राव खऱ्या अर्थानं भारतरत्न, सर्वोच्च उपाधी प्रदान करणे हीच त्यांना श्रद्धांजली - एस. एस. राजमौली - ramoji rao passed away
  2. सुधा चंद्रन, रितेश देशमुख ते भरत जाधव यांच्यापर्यंत दिग्गज स्टार्सना लॉन्च करणारे रामोजी राव - Ramoji Rao
  3. "ये पवन नहीं आँधी है" : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.