ETV Bharat / entertainment

लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतनं केलं शाहरुख खानवर वक्तव्य - kangana ranaut - KANGANA RANAUT

Kangana Ranaut And SRK : अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यावर तिनं शाहरुख खानवर वक्तव्य केलं आहे. तिनं स्वत:ची तुलाना 'किंग खान'बरोबर केली आहे.

Kangana Ranaut And SRK
कंगना रणौत आणि शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 1:18 PM IST

मुंबई - Kangana Ranaut And SRK : 'कंट्रोवर्शियल क्वीन' कंगना रणौत गेल्या नऊ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट देऊ शकलेली नाही. या नऊ वर्षांत तिनं सलग 10 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. आता कंगना स्वतःची तुलना अभिनेता शाहरुख खानशी करत आहे. गेल्या 9 वर्षांपासून बॉक्स ऑफिसवरच्या अपयशावर कंगनानं आता वक्तव्य केलं आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या कमबॅकवर कंगना राणौतनं म्हटलं, ''सुपरस्टार्सनाही फ्लॉपचा सामना करावा लागतो. संपूर्ण जगात असा कोणी नाही की, ज्यानं कधी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपट दिला नाही. शाहरुख खानचे 10 चित्रपट चालले नाहीत, मग त्यानं 'पठाण' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत कमबॅक केला.''

कंगना राणौत केली 'किंग खान'शी आपली तुलना : कंगना राणौतनं पुढं म्हटलं, "माझा आठ वर्षे एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, नंतर 'क्वीन' प्रदर्शित झाला, त्यानंतर तीन-चार वर्षांनी मणिकर्णिका प्रदर्शित झाला, आता 'इमर्जन्सी' रिलीज होणार आहे, मला वाटतं की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. शाहरुख खान लास्ट जेनरेशन स्टार आहे, देवाच्या कृपेन मी देखील एक स्टार आहे आणि मला खूप ऑफर्स येतात." याशिवाय कंगनानं म्हटलं की, 9 वर्षात दिलेल्या 10 फ्लॉप चित्रपटांचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि ती अजूनही स्टार आहे. कंगना वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता कंगनानं भाजपा उमेदवार म्हणून राजकारणात प्रवेश केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून ती आपले नशीब आजमावणार आहे.

कंगना राणौतचे शेवटचे 10 फ्लॉप चित्रपट

चंद्रमुखी 2

तेजस

धाकड

पंगा

जजमेंटल है क्या ?

सिमरन

रंगून

कट्टी बट्टी

उंगली

रिव्हॉल्व्हर राणी

कंगना राणौत वर्कफ्रंट : कंगाना शेवटी 'चंद्रमुखी' या तामिळ चित्रपटामध्ये राघव लॉरेन्सबरोबर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता ती पुढं ती 'वेट्टायन' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. श्रेयस तळपदे, विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर - Kartam Bhugtam
  2. आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' वेब सीरीजच्या शूटिंग सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Aaryan Khan and Stardom web series
  3. पाक अभिनेत्री सना जावेदनं पती शोएब मलिकबरोबर साजरा केला 31 वा वाढदिवस; फोटो व्हायरल - Sana celebrated her 31st birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.