मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलय. उलट भाजपानं एक निवेदन जारी केलं असून कंगना रणौतला धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलय. भाजपा खासदार कंगनानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेलं विधान हे पक्षाचं मत नाही, असं सांगत पक्षानं एक निवेदन जारी केलं. कंगना राणौतच्या वक्तव्यावर भाजपानं असहमती व्यक्त केली आहे. कंगनानं पक्षाच्या वतीनं भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर भविष्यात असं कोणतंही वक्तव्य करू नये, असे तिला निर्देश देण्यात आले आहेत. कंगना म्हणाली होती की, जे बांगलादेशात झालं ते येथेही व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी आंदोलनात मृतदेह लटकत होते, बलात्कार होत होते. वाचा संपूर्ण बातमी...
Kangana Ranaut: Bangladesh like anarchy could have happened in India also like in the name of Farmers protest. Outside forces are planning to destroy us with the help of insiders. If it wouldn't have been foresight of our leadership they would have succeded. pic.twitter.com/05vSeN8utW
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 25, 2024
कंगना राणौतचं वादग्रस्त विधान : कंगनानं असं म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सरकारच्या सतर्कतेमुळे तसं झालं नाही. कंगना राणौतच्या वक्तव्यावरुन बराच वाद आता निर्माण झाला आहे. याआधीही शेतकरी आंदोलनादरम्यान तिनं काही कमेंट्स केल्या होत्या, यानंतर तिच्याविरोधात संताप भडकला होता. यापूर्वी चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफच्या जवानानं तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर कुलविंदरनं शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिची आईही सामील झाली होती असं सांगितलं होतं. कंगनानं आंदोलन करणाऱ्या महिलांबद्दल म्हटलं होतं की, या महिलांना प्रत्येकी 100 रुपये देऊन आणण्यात आल होतं, यानंतर अनेकजण तिच्यावर चिडले होते.
DSGMC strongly objects the deliberate attempt by Ms. Kangana Ranaut, Director & Co-Producer to misrepresent Sikhs as the separatists in her upcoming movie " emergency".
— Harmeet Singh Kalka (@hskalka) August 22, 2024
in the teaser released recently, it is observed that an anti-sikh narrative about the martyrs of june 1984 is… pic.twitter.com/Z3dfWWWFzB
पक्षाचा कंगना राणौतला सल्ला : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत असल्याचं कंगना राणौतचं मत आहे. तिथे बलात्कार आणि हत्या होत असल्याचं तिनं म्हटलं होतं. केंद्र सरकारनं शेतकरी विधेयक मागे घेतलं नाहीतर तिथे भोंदूबाबांची खूप मोठी योजना होती. हे देशात काहीही करू शकतात. कंगनानं शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर पंजाबचे माजी काँग्रेस मंत्री राजकुमार वेरका यांनी तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, कंगना राणौत रोजच पंजाबच्या नेत्यांबद्दल वाईट बोलते. आता या विधाननंतर कंगना पुन्हा एकदा पंजाबमधील शेतकऱ्यांच्या नजरेत आली आहे.
अभी थप्पड़ का निशान गया नहीं फिर वही बात कह गयी
— Dhruv Rathee Parody (@Dhruv_Rathee20) August 25, 2024
अब फिर कोई बेटी उठ खड़ी हुई तो दोनों गाल पर थप्पड़ जड़ कर जायेगी #KanganaRanaut तेरी हरकत हर बार थप्पड़ खाने वाला ही होता है
अब इस पर भाजपाई क्या बोलेंगे
प्रधानमंत्री जी क्या कहना है आपको इस पर pic.twitter.com/6CrNfx9sLN
हेही वाचा :