ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले'मध्ये कमल हासननं केलं टेक्नीशियनचं काम - amitabh bachchan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 5:03 PM IST

Kalki 2898 AD : अमिताभ बच्चन स्टारर 'शोले'मध्ये कमल हासननं केलं टेक्नीशियनचं काम केल्याचं आता उघड झालं आहे. 'कल्की 2898 एडी' प्रमोशनदरम्यान याबाबत कमल हासननं खुद्द खुलासा केला आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी (instagram)

मुंबई - Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 19 जून रोजी संध्याकाळी या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यांच्याबरोबर कमल हासन देखील होता. या कार्यक्रमात कलाकारांनी चित्रपटाबद्दल चर्चा केली. यावेळी काही मजेदार आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी कमल हासन यांना चित्रपटाच्या पहिल्या शोचे तिकीट दिलं. यानंतर हासननं एक प्रसंग सांगितला. साऊथ चित्रपटसृष्टीत कलाकारांना चित्रपटांच्या पहिल्या शोसाठी तिकीट देण्याची परंपरा आहे.

'कल्की 2898 एडी'चं तिकीट : या कार्यक्रमात निर्माता अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना 'कल्की 2898 एडी'चं तिकीट दिलं. हे तिकट कमल हासन आणि बिग बीनं एकत्र हातात पकडलं. अमिताभ यांना हे तिकिट मिळाल्यानंतर कमल हासन खूप खूश होते. एक जुनी गोष्ट सांगताना हासन यांनी सांगितलं की, 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात त्यांनी टेक्नीशियनचं काम केलं आहे. 'शोले' चित्रपट पाहण्यासाठी त्यांना तीन आठवडे बराच वेळ वाट पाहावी लागल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी पुढं म्हटलं, "अमिताभ बच्चन यांच्याकडून फर्स्ट डे, फर्स्ट शोचे तिकीट मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी तेव्हा चित्रपट टेक्नीशियन होतो आणि आता अभिनेता आहे. फारसा बदल झालेला नाही."

अमिताभ यांनी कमल हसन दिलं तिकीट : 'कल्की 2898 एडी'मध्ये कमल हसननं खलनायकाची भूमिका साकारली आहे. याबाबतही त्यांनी कार्यक्रमात चर्चा केली. हासनं यांनी सांगितलं, "मला नेहमी खलनायकाची भूमिका करायची होती म्हणून मी अमितजींसमोर रंगमंचावर रडत होतो. खलनायकांना चित्रपटात सर्व चांगल्या गोष्टी करायला मिळतात. नायक रोमँटिक गाणी गातो आणि नायिकेची वाट पाहतो. मला वाटलं की, मला खलनायकाची पात्र मिळाली तर मजा येईल. दिग्दर्शक नाग अश्विन यांना काही वेगळे हवे होते म्हणून मी चित्रपटात वाईट कल्पना असलेल्या साधूसारखा असेन. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया - nana patekar
  2. कंगना रणौतच्या प्रतिक्रियेनंतर अन्नू कपूरनं माफी मागितली, जाणून घ्या प्रकरण... - annu kapoor apologized
  3. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी मनीषा कोईरालानं पाठवली खास भेटवस्तू - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.