ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरचा वाढदिवस: राम चरण स्टारर RC16 चित्रपटाच्या निर्मांत्यांकडून जान्हवी कपूरचे स्वागत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 12:42 PM IST

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर आपला वाढदिवस साजरा करत असतानाच आरआरआर स्टार राम चरणच्या चित्रपटात ती काम करणार असल्याची अधिकृत घोषणा RC16 चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. या आधी ज्युनियर एनटीआरच्या बरोबर देवरा या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर जान्हवीचा हा दुसरा साऊथ इंडियन चित्रपट असेल.

Janhvi Kapoor Birthday
जान्हवी कपूरचा वाढदिवस

मुंबई - Janhvi Kapoor Birthday: अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज 27 वा वाढदिवस आहे. जान्हवीने 2018 मध्ये त्याने 'धडक' चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक'मध्ये जान्हवी बरोबर इशान खट्टरही दिसला होता. या चित्रपटातील जान्हवीचा अभिनय अनेकांना खूप आवडला होता. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिची आई श्रीदेवीचा मृत्यू झाल्यानं तिच्यावर मोठं संकट आलं. पण यावर मात करत तिनं आपला अभिनय प्रवास सुरू ठेवलाय.

'धडक'नंतर 'घोस्ट स्टोरीज', 'गुंजन सक्सेना', 'रुही', 'गुडलक जेरी', 'मिली', 'बवाल', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' यासारख्या चित्रपटातून तिनं काम केलंय. आणि आगामी काळातही तिच्या हातामध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत. यापैकी सर्वात महात्वाचा प्रोजेक्ट आहे तो 'मिस्टर आणि मिसेस माही' आणि दाक्षिणात्य चित्रपट 'देवरा'. ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा'मध्ये ती सहभागी झाल्यानंतर आणखी एक साऊथच्या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. जान्हवी आणि राम चरण एकत्र काम करणार असलेल्या या चर्चेला आता विराम मिळाला असून आता त्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. जान्हवीच्या वाढदिवशी, RC16 असे तात्पुरते शीर्षक असलेल्या राम चरण स्टारर चित्रपटाच्या टीमने ही घोषणा केली आणि तिला बोर्डात घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मैत्री मुव्ही मेकर्स आणि वृद्धी सिनेमा प्रॉडक्शन बॅनरने जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर ही घोषणा केली. 'आरआरआर'मधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या राम चरणने RC16 हा 'रंगस्थलम'च्या यशाला मागे टाकणारा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे संकेत दिले आहेत.

जान्हवी कपूरच्या समावेशामुळे चित्रपटात अधिक स्टार पॉवर जोडली जाणार आहे. तिचे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. समंथा रुथ प्रभूला महत्त्वाच्या भूमिकेसाठी सामील केले जातील अशी अटकळ देखील आहे, तथापि, अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा केली जात आहे.

वेंकट सतीश किलारूचे चित्रपट निर्मितीत पदार्पण असलेला RC16 हा चित्रपट बुची बाबू सना दिग्दर्शित आहे. वृद्धी सिनेमाज आणि सुकुमार रायटिंग्स यांच्या पाठिंब्याने हा प्रकल्प ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध करण्याचे ठरवले आहे.

ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा'मध्ये मुख्य भूमिका मिळविल्यानंतर RC16 ही जान्हवीची तेलगूमधील हा दुसरा चित्रपट असेल. कोराटला सिवा द्वारे दिग्दर्शित, 'देवरा' या चित्रपटाचा पहिला भाग 10 ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. दरम्यान, जान्हवी राजकीय थ्रिलर 'उलझ' आणि 'मिस्टर आणि मिसेस माही'मध्ये काम करत आहे. तिने दोन्ही प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण केले आहेत.

हेही वाचा -

  1. 'मडगाव एक्सप्रेस'मधून दिग्दर्शनात पदार्पण कसे झाले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
  2. प्रतीक गांधी दिव्येंदू अविनाश तिवारी स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' ट्रेलर प्रदर्शित
  3. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लग्नपत्रिका लीक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.