ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील फर्स्ट लूक रिलीज - janhvi kapoor and rajkummar rao - JANHVI KAPOOR AND RAJKUMMAR RAO

Mr And Mrs Mahi: जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर तीन फोटो पोस्ट केले आहेत.

Mr And Mrs Mahi
मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही ('मिस्टर एंड मिसेज माही'(karanjohar- Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 2:03 PM IST

Updated : May 8, 2024, 2:54 PM IST

मुंबई - Mr And Mrs Mahi: अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'च्या फर्स्ट लूकची वाट पाहत होते. आज 8 मे रोजी 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटाचा निर्माता करण जोहरनं जान्हवी आणि राजकुमारचा चित्रपटामधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. करणनं 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटामधील तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी आणि राजकुमार एकामेंकाबरोबर आनंदी दिसत आहेत.

'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'चं फर्स्ट लूक : करण जोहरनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' मधील जान्हवी आणि राजकुमार रावचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं, "प्रेम, ऑल आउट, एका अपूर्ण आणि परिपूर्ण भागीदारीचे साक्षीदार व्हा. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' 31 मे रोजी चित्रपटगृहे येत आहेत." या चित्रपटाचे दिग्दर्शन सरन शर्मा यांनी केलंय. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर हे पहिल्यांदाच एकत्र स्किन शेअर करत आहेत. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटाची कहाणी टीम इंडियाचा माजी क्रिकेट स्टार कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित आहे. याआधी धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' बनवण्यात आला होता. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं धोनीची उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

जान्हवी कपूर राजकुमार रावचं वर्क फ्रंट : जान्हवी आणि राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी वरुण धवनबरोबर' बवाल' या चित्रपटात दिसली होती. आता पुढं ती 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जान्हवी साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. शिवा कोरातला यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'उलझ' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे राजकुमार हा 'श्रीकांत', 'स्त्री 2' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रेग्नेंसी फेजमध्ये दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगबरोबर विमानतळावर झाली स्पॉट, फोटो व्हायरल - Ranveer Singh and Deepika Padukone
  2. श्वेता तिवारीनं तिच्या थायलंडच्या सुट्टीतील हॉट फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर - shweta tiwari share hot pictures
  3. शिखर पहारियाबरोबरच्या तिरुपतीमधील लग्नाच्या अफवांवर जान्हवी कपूरनं दिली प्रतिक्रिया - janhvi kapoor

Last Updated : May 8, 2024, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.