ETV Bharat / entertainment

जयदीप अहलावतनं केला जदुनाथ 'महाराज'च्या जोरदार तयारीचा खुलासा - Maharaj Jaideep Ahlawat

Maharaj Jaideep Ahlawat : 'महाराज' या चित्रपटात जयदीप अहलावतनं जदुनाथ महाराज ही आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यापूर्वी त्याच्या मनात बऱ्याच शंका होत्या. यावर त्यानं कशी मात केली यासह अनेक गोष्टींचा खुलासा त्यानं केला आहे.

Jaideep Ahlawat
जयदीप अहलावत (Maharaj trailer image grab)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 5:08 PM IST

मुंबई - Maharaj Jaideep Ahlawat : ज्येष्ठ अभिनेता जयदीप अहलावत यानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराज' चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी केलेल्या जोरदार तयारीबद्दलचा खुलासा केला आहे. एएनआयशी बोलताना जयदीपनं नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात जदुनाथ महाराजांच्या आव्हानात्मक भूमिकेसाठी केलेल्या तयारीचा प्रवास कथन केला.

अहलावत यांनी या व्यक्तिरेखेबद्दल सुरुवातीच्या शंका बोलून दाखवल्या आणि कबूल केलं की, "सुरुवातीला मला वाटलं की हे एक अतिशय कठीण पात्र आहे. ते हाताळणं सोपं नाही. मी माझ्या भावाला सांगितले की मला वाटत नाही. मी हे करू शकेन." चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर झालेल्या भेटीनंतर जयदीपसाठी टर्निंग पॉइंट आला. या भेटीत त्याला मजबूत दृष्टी आणि आकर्षक कथन सादर केल्यानं तो आश्वस्त झाला. "त्यांनी महाराजांना ज्या प्रकारे कथन केलं, त्यामुळं मला असं वाटलं की, होय, मी हे केले पाहिजे. हे यशस्वी झालं कारण माझा लेखन आणि माझ्या दिग्दर्शकावर विश्वास होता," असं म्हणत जयदीपनं आपल्या सहकाऱ्यांवरचा विश्वास व्यक्त केला.

लॉकडाऊन दरम्यान, जयदीपनं स्वतःला भरपूर शारीरिक प्रशिक्षणासाठी समर्पित केलं होतं. कारण या भूमिकेसाठी तयारी करण्यापूर्वी त्याचं वजन सुमारे 104 किलो असल्यानं त्याला पुन्हा आकारात यायचं होते. तो म्हणाला, "म्हणून, जवळजवळ 5.5 महिन्यांचे कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतलं. कारण जेजे स्क्रीनवर दिसत असल्यामुळं, माझ्या प्रशिक्षकानं माझ्यावर खूप मेहनत घेतली. आम्ही दिवसातून 3-4 वेळा वर्कआउट्स केलं." जयदीपनं त्याच्या यशाचं श्रेय टीमला दिलं. तो म्हणाला, "म्हणून याचं श्रेय सर्वांना जातं. या लोकांनी निर्माण केलेल्या सर्व उर्जेचं रूपांतर करण्यासाठी मी फक्त एक साधन ठरलो."

1862 च्या महाराज बदनाम प्रकरणाच्या कथेवर आधारित या चित्रपटाला गुजरात उच्च न्यायालयाने कायदेशीर स्थगिती दिल्यानं त्याच्या रिलीजवर तात्पुरता झटका बसला होता. यावरची स्थगिती शुक्रवारी उठवण्यात आली आणि हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाला.

सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'महाराज'मधून अभिनेता जुनैद खान यानं महत्त्वाची भूमिका साकारत दमदार पदार्पण केलं आहे. जुनैद आणि जयदीप अहलावत यांचा पडद्यावर अभिनयाचा कस लागला असून दोघांनीही आपल्या भूमिकांना उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व भारतातील सत्य घटनांवर आधारित आहे आणि करसनदास मुळजी या समाजसुधारकाच्या साहसी विचार आणि कृतीवर प्रकाश टाकतो. त्यांनी स्त्री शोषणाची ऐतिहासिक कायदेशीर लढाई जिंकुन समाज बदलाच्या प्रक्रियेत आपलं महत्तवपूर्ण योगदान दिलं होतं. समीक्षक आणि प्रेक्षक यांनी 'महाराज'चे आकर्षक कथाकथन आणि दमदार अभिनयासाठी कौतुक केलं आहे.

हेही वाचा -

खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT

अभिनेता जितेंद्रच्या ड्रेस डिझाईनरचा चोरीला गेलेला मोबाईल सापडेल का? - A stolen mobile phone

शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.