मुंबई - Hema Malini: बॉलिवूडची 'ड्रीमगर्ल' असा लौकीक असलेल्या हेमा मालिनींचा मोठा चाहतावर्ग आहे. हेमा मालिनी सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्याबरोबर एक महिला चाहती दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही चाहती हेमा मालिनी यांच्या जवळ फोटो क्लिक करण्यासाठी आली होती. तिनं हेमा यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करताच हेमा यांना 'अन्कंफर्टेबल' वाटायला लागलं. यावेळी हेमा मालिनी यांनी ''हँड नहीं'' असं म्हटलं. थोडक्यात त्यांनी महिला चाहतीचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेऊ दिला नाही. फोटो काढताना हेमा मालिनी थोड्या अस्वस्थ झाल्या. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून ट्रोल करत आहेत.
हेमा मालिनी झाल्या ट्रोल : हेमा मालिनी यांच्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "हिला वोट करू नका, स्त्री मानव जातीचा ही द्वेष करते, मॅडम पुढच्या वेळी स्वर्गात निवडणूक लढवतील." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अशा लोकांना माणसांची ॲलर्जी असते, यांना इतकं महत्त्व देण्याची गरज नाही." आणखी एकानं लिहिलं, "या बाईबरोबर फोटो कशाला पाहिजे, अशा लोकांना पाहिल्यानंतर दुर्लक्ष करायला हवे. यानंतर त्यांना पब्लिकचं महत्व समजेल. लोकांनी यांना डोक्यावर चढून ठेवले आहे." आता या पोस्टवर यूजर्स खूप भरभरून कमेंट्स करून हेमा मालिनीला खडे बोल सुनावताना दिसत आहेत.
हेमा मालिनी यांची तुलना जया बच्चनबरोबर : हेमा मालिनी यांचं असं वागणं सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडलं नाही. काही लोकांनी तिची तुलना जया बच्चन यांच्याबरोबर करत आहेत. यापूर्वी देखील ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेली विनेश फोगटची खिल्ली हेमा मालिनी यांनी उडवली होती. यानंतर देखील सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. विनेश फोगटबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी पराकोटीची टीका केली. हेमा मालिनी या अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात. याशिवाय त्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत. अनेकदा ती आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आता अलीकडे तिनं सोशल मीडियावर चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक केलं होतं.