मुंबई - Ananya Panday in Call Me Bae: 'कॉल मी बे' या बहुप्रतिक्षित वेब सीरिजमधील बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा फर्स्ट लूक मंगळवारी दुपारी प्रदर्शित झाला. या मालिकेत ती अब्जाधीश फॅशनिस्टाच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेबद्दलची घोषणा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आली होती आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये शोच्या पहिल्या सीझनचे शुटिंग पूर्ण करण्यात आले होते.
मंगळवारी इन्स्टाग्रामवर निर्मात्यांनी अनन्याचा फर्स्ट लुक टाकला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "मालमत्तेची वारसदार ते उद्योजिका असलेल्या बे हिने शोधून काढली की, तिचे किंमती मालमत्ता हिरे नाहीत तर तिचे तिची स्ट्रीट स्मार्ट आणि स्टाईल आहे. तिनं बंधने तोडली परंतु तोडल्याचं नाकारलं आणि ती मुंबईच्या न्यूजरुममधून तिच्या प्राणप्रिय जीवलग, बहिणी आणि तिच्या भल्यासाठी ती सही सलामत निघाली."
पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या,साठी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. एकाने लिहिले की, "अनन्या पांडे खूप सुंदर दिसत आहे" अशी टिप्पणी केली, तर दुसऱ्याने उत्सुकता व्यक्त करताना लिहिले, "तिची कामगिरी पाहण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही."
आगामी 'कॉल मी बे' या प्राइम व्हिडीओ मालिकेत अनन्या पांडे ही बेईच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती एका फॅशन टायकूनची भूमिका साकारत आहे. यामध्ये ती कठीण परीक्षेला सामोरे जाताना तिच्या श्रीमंत कुटुंबापासून विभक्त होण्याचा सामना करते. कथा जसजशी उलगडत जाईल, तसतसे प्रेक्षक बे च्या बदलत गेलेल्या प्रवासाचे साक्षीदार होतील. या प्रवासामध्ये सामाजिक पूर्वाग्रह आणि पूर्वकल्पनांविरुद्ध लवचिकता पाहायला मिळेल.
कॉलिन डी'कुन्हा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मिक एंटरटेनमेंटच्या वतीने निर्मित केलेल्या, या मालिकेत वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कक्कन जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनरिंग यांसारख्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा -