ETV Bharat / entertainment

विजय वर्मा स्टारर 'आईसी 814 द कंधार हायजॅक'वर टांगती तलवार, याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल - vijay varma

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 3, 2024, 10:52 AM IST

Updated : Sep 3, 2024, 12:48 PM IST

IC 814: The Kandahar Hijack : विजय वर्माची प्रमुख भूमिका असलेली 'आईसी 814 द कंधार हायजॅक' ही वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरीजवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

IC 814: The Kandahar Hijack
आईसी 814 द कंधार हाईजॅक (आईसी 814: द कंधार हाईजॅक पोस्टर (Instagram))

मुंबई - IC 814: The Kandahar Hijack : हिंदू सेनेचे प्रमुख सुरजीत सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून नेटफ्लिक्स वेब सीरीज 'आईसी 814 द कंधार हाईजॅक'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांची नावे हिंदू देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दहशतवाद्यांची खरी ओळख लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहे. वकील शशी रंजन यांच्यानुसार अनुभव सिन्हा-दिग्दर्शित 'आईसी 814 द कंधार हायजॅक' मध्ये 1999ला झालेल्या भारतीय फ्लाइट 814बद्दल चुकीचं दाखवलं गेलं आहे.

'आईसी 814 द कंधार हायजॅक' वादाच्या भोवऱ्यात : अपहरणकर्त्यांनी ओळख लपवणं हे चुकीचं आहे. या धक्कादायक घटनेचं चुकीचं चित्रण करणे हानिकारक असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काझी, जहूर मिस्त्री आणि शाकीर यांना 'भोला' आणि 'शंकर' अशी चुकीची नावे देण्यात आली आहेत. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सार्वजनिक गैरसमज आणि संभाव्य हानी टाळण्यासाठी याचिकाकर्त्यानं न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या याचिकेत पुढे सांगण्यात आलं आहे की, बहुधर्मीय समाजात धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोखा राखणारी भारतीय राज्यघटना सर्व धर्मांचा परस्पर आदर आणि मूलभूत हक्क हे अनिवार्य करते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समन्स बजावले : यापुढं सांगण्यात आलं आहे, धार्मिक भावना दुखावू नयेत याची खबरदारी घेणं, हे चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. फीचर फिल्म्सचं नियमन करण्यासाठी संसदेनं सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 लागू केला होता. याचिकेत 'आईसी 814 द कंधार हाईजॅक' या वेब सीरीज संदर्भात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आल्यानंतर आता अनेकजण याबद्दल सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत. 'आईसी 814 द कंधार हायजॅक'च्या निर्मात्यांनी जाणूनबुजून अपहरणकर्त्यांची नावे बदलून 'भोला' आणि 'शंकर' ठेवल्याची सोशल मीडियावर आता चर्चा होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर झालेल्या आरोपांना उत्तर देताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना समन्स बजावले आहे.

हेही वाचा :

  1. 'आयसी 814: द कंधार हाईजॅक'वर बंदीची मागणी, विजय वर्मा स्टारर वेब सीरीजवर यूजर्स झाले नाराज - IC 814 the Kandahar Hijack

Last Updated : Sep 3, 2024, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.