मुंबई - प्रसिद्ध ब्रिटीश गायक आणि संगीतकार एड शीरन आज 16 मार्च रोजी त्याच्या जादुई संगीताने भारतातील तरणाईला मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या शोच्या अगदी आधी त्याने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीं बरोबर दर्जेदार वेळ घालवला. त्यापूर्वी आयुष्मान खुराना, फराह खानसह अनेक स्टार्स आणि गायकांसह फोटो काढताना दिसला होता. भारताची भेट अविस्मरणीय करण्यासाठी त्यानं मुंबईतील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचेही मनोरंजन केले. अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्याच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्याचं पाहायला मिळाला.
दरम्यान, किंग ऑफ कॉमेडी कपिल शर्माने एड शीरनच्या सन्मानार्थ एक शानदार सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर, फराह खाननेही त्यांच्यासाठी एका शानदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी भरभरून दाद दिली, संगीत, हशा आणि उत्कृष्ट मनोरंजनाने भरलेल्या रात्री एड शरीन कधीही विसरणार नाही.
इंस्टाग्रामवर पापाराझो अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, हृतिक रोशन, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलगा ह्रहान यांच्यासह फराहने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये प्रवेश करताना दिसला. हृतिकने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा ड्रेसची निवड केली होती. तर त्याची मैत्रिणी सबा आझादने राखाडी पँटसह स्लीव्हलेस ब्लॅक क्रॉप टॉप घातलेला होता. पार्टीच्या दिशेने जाण्यापूर्वी त्यांनी एकत्र पाराझींना फोटोसाठी पोझ दिली.
पार्टीत सामील झालेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये मलायका अरोरा, आर्यन खान, राजकुमार राव आणि पत्रलेखा, हुमा कुरेशी, अर्शद वारसी पत्नी मारिया, माधुरी दीक्षितसह डॉ श्रीराम नेने, फरहान अख्तर, अनुषा दांडेकर, महीप कपूर आणि इतर अनेक सेलेब्रिटी पाहुण्यांचा समावेश होता.
एड शरीनचा भारतातील म्यूझिक कॉन्सर्ट आज 16 मार्च रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानात पार पडणार आहे. गली काही दिवसापासून इथं जोरदार तयारी केली जात असून देशभरातून मोठ्या संख्येने तरुण प्रेक्षक मुंबईत दाखल झाले आहेत. भारतात त्यांच्या आवडत्या एड शरीनचा आवाज ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झाले असून आजचा संध्याकाळ संस्मरणीय करण्यासाठी एड शरीन आणि त्याची संगीतकारांची टीम सज्ज झाली आहे.
हेही वाचा -