ETV Bharat / entertainment

गुरु पौर्णिमानिमित्त कंगना रणौतनं तिच्या बालपणीच्या गुरुची झलक केली शेअर, झाली ट्रोल - Guru Purnima

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 3:16 PM IST

Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या बालपणीच्या गुरुचा फोटो शेअर केला आहे. आता अनेकजण या फोटोच्या कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत.

Guru Purnima 2024
गुरु पौर्णिमा 2024 (कंगना रणौत (फाईल फोटो) (ANI))

मुंबई - Guru Purnima 2024 : देशभरात आज 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. या शुभ प्रसंगी अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या चाहत्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं तिच्या बालपणीच्या गुरुची झलकही दाखवली आहे, ज्यांना ती आदर्श मानते. तिनं एक्सवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं यावर कॅप्शन दिलं, "जो लहानपणापासून माझा गुरु आहे, ज्यांनी मला नेहमी त्यांच्या आशीर्वादानं आणि शिकवणीनं मार्गदर्शन केलंय. आज मी रामकृष्ण मठात जाण्यासाठी पहाटे दिल्लीहून निघाले. स्वामी विवेकानंदजींनी मी प्रथम आशीर्वाद घेतला."

कंगना रणौत झाली ट्रोल : आपल्या गुरुंचा उल्लेख करत कंगनानं पुढं लिहिलं आहे की, "गुरुबद्दल काय सांगू, हे नरकासारखं जीवन फक्त गुरुंच्या चरणी बघूनच स्वर्ग बनतं, गुरुंचा आशीर्वाद सर्वांवर असो, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा." फोटोबद्दल बोलायचं झालं तर, "पहिल्या फोटोत स्वामी विवेकानंदांची झलक पाहायला मिळते. इतर फोटोत, कंगना पूजा केल्यानंतर तिच्या गुरुंचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बेज आणि फिकट पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये कंगना ही आकर्षक दिसत आहे. आता कंगानानं शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, "मॅडम, मी ऐकलं होतं की, तुमचा फिल्मी गुरु आदित्य पंचोली होते? बरं गुरु हा गुरु असतो, नाही का?" आणखी एकानं लिहिलं, "देव तुम्हाला बुद्धी देवो."

कंगना राणौतचा वर्कफ्रंट : कंगना राणौतनं नुकतीच तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'इमर्जन्सी'ची निर्मिती रेणू पिट्टी आणि कंगना यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाला संगीत संचित बल्हारा यांनी दिले आहे. सध्या कंगनाचा हा चित्रपट खूप चर्चेत आहे. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण तिचे मागील अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते.

हेही वाचा :

  1. कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED
  2. खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan
  3. "महाराष्ट्रातून त्यांच्यापेक्षाही मोठे वरिष्ठ...", कंगना रणौतच्या 'त्या' मागणीवरुन संजय राऊत संतापले - Maharashtra Sadan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.