मुंबई - FIR fame Kavita Kaushik : 'एफआयआर' या टीव्ही शोमध्ये इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून टीव्ही जगतात अधिराज्य गाजवणारी, अभिनेत्री कविता कौशिकनं टीव्ही इंडस्ट्रीला बाय-बाय म्हटलं आहे. कविता कौशिकचं टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचं कारण देखील समोर आलं आहे, आता ती पुढे काय करणार हे तिनं सांगितलं आहे. कविता मुंबई सोडून पतीबरोबर डोंगराळ प्रदेशात स्थायिक झाली आहे. रिपोर्टनुसार कवितानं एका मुलाखतीत सांगितलं की, "मी 30 दिवस सलग काम करू शकणार नाही, त्यामुळे मला टीव्हीमध्ये काम करायचे नाही, पण मी वेब सीरीज आणि चित्रपटांसाठी नेहमीच तयार असेन, मी माझ्या व्यक्तिमत्वानुसार फक्त काही भूमिका करेल. मी काही सामान्य नायिका नाही जिला सर्व प्रकारच्या भूमिकेत कास्ट करता येईल"
कविता कौशिक करत आहे व्यवसाय : पुढं तिनं सांगितलं की, "मला खलनायिकेच्या भूमिका मिळतात. मी 3 वर्षापूर्वी जसे आयुष्य जगले तसे पुन्हा मला जगायचे नाही. याआधी मी हे सर्व केलं ते फक्त पैसे कमविण्यासाठी." दरम्यान कविता कौशिक पती रोनित बिस्वासबरोबर उत्तराखंडला गेली आहे आणि तिथे ती आयुर्वेदीक प्रोडक्ट्सचा व्यवसाय करत आहे. यानंतर तिनं पुढं सांगितलं, "मी माझ्या पतीबरोबर उत्तराखंडमध्ये आहे, मी मुंबई सोडली आहे, शूटिंग असते तेव्हाच मी मुंबईत येते." याआधी कविता पतीबरोबर गोव्याला गेली होती, तिला तिथली उष्णता सहन होत नव्हती, त्यामुळे ती उत्तराखंडच्या खोऱ्यात राहत आहे.
कविता उत्तराखंडच्या खोऱ्यात : कवितानं सांगितलं की, इथे ती एका मोठ्या बंगल्यात काही पाळीव प्राण्यांबरोबर राहते. या बंगल्यात एक मोठी बाग आहे, तिथे ती थोडीफार शेतीही करते. आता ती येथे गायी आणि हंस पाळणार आहे. कविताला आता ही जीवनशैली आवडली आहे. त्यामुळे तिला मुंबईत पुन्हा स्थायिक होण्याची इच्छा नाही. तसेच कवितानं टीव्ही कंटेंटबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिनं पुढं सांगितलं, "टीव्ही कंटेंटही खूप मागास विचाराचा बनला आहे. त्यामुळे मला त्याचा भाग व्हायचे नाही. एक काळ असा होता की टीव्हीवर चांगल्या गोष्टी दाखविल्या जात होत्या. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शो होते, पण आता ज्या प्रकारचा कंटेंट येत आहे तो तरुण पिढीसाठी खरोखरच घातक आहे." आता कविता उत्तराखंडच्या खोऱ्यात खूप खूश आहे.
हेही वाचा :