मुंबई - Fawad Khan : पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील कलाकार फवाद खानचं भारतात प्रचंड चाहते आहेत. फवाद हा पाकिस्तानमधील एक टीव्ही स्टार आहे होता. आता तो पाकिस्तानी चित्रपटसृष्टीवर राज्य करतो. फवाद खानच्या लोकप्रियतेमुळे त्याला बॉलिवूडमध्येही संधी मिळाली. गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी असल्यानं काही कलाकारांना त्याच्या मायदेशी परत जावे लागले होते. आता फवाद खान पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत परतणार आहे. याआधी त्यानं भारतीय चाहत्यांची माफी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फवाद खाननं म्हटलं आहे की, "मी भारतातील माझ्या चाहत्यांचा आभारी आहे की ज्यांनी माझी वाट पाहिली. मी माझ्या भारतीय चाहत्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावल्याबद्दल माफी मागतो."
फवाद खानचे बॉलिवूड चित्रपट : त्यानं पुढं म्हटलं की, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, अनुपस्थितीमुळे एक आवड निर्माण होते." 'आंख ओझल, पहाड ओझल' अशी म्हण त्यानं म्हटली आहे. फवाद खान बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरबरोबर एका रोमँटिक बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याचं समजत आहे. फवाद खानची बॉलिवूडमध्ये एंट्री 2014 मध्ये 'खूबसूरत' या चित्रपटातून झाली होती. या चित्रपटात त्यानं सोनम कपूरबरोबर काम केलं होतं. 'अभी तो पार्टी शुरु हुई है' हे बादशादचं गाणं या चित्रपटामधील खूप लोकप्रिय झालं होतं. यानंतर फवाद खान सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टबरोबर 'कपूर अँड सन्स' (2016) या चित्रपटात दिसला होता.
फवाद खानचे आगामी प्रोजेक्ट् : या चित्रपटात फवाद आणि आलियाची केमिस्ट्री खूप सुंदर होती. 2016 मध्ये, अभिनेता रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात देखील तो दिसला होता. दरम्यान फवादच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी पाकिस्तानी चित्रपट 'मनीबॅक गॅरंटी' (2023) मध्ये दिसला होता. आता तो 'नीलोफर' आणि 'आन' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो सध्या काही वेब सीरीजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.