ETV Bharat / entertainment

एल्विश यादवच्या आईच्या डोळ्यात अश्रू ; व्हिडिओ व्हायरल - Elvish yadav mother crying

Elvish Mother : एल्विश यादवच्या अटकेनंतर त्याच्या आईचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मागचं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.

Elvish Mother
एल्विशची आई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 11:09 AM IST

मुंबई - Elvish mother : 'बिग बॉस ओटीटी' विजेता एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे. तो सध्या नोएडा पोलिसांचा ताब्यात आहे. काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या सापाच्या विषाच्या प्रकरणात ही कारवाई केल्या गेली आहे. एल्विश तुरुंगात गेल्यापासून त्याच्या कुटुंबाची अवस्था खूप वाईट झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची आई रडताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, मात्र व्हिडिओ सध्याचा आहे की जुना यावर प्रश्न निर्माण आता होत आहेत.

एल्विशच्या आईच्या डोळ्यात अश्रू : न्यायालयानं एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता त्याला अनेक दिवस तुरुंगात घालवावे लागणार आहेत. दरम्यान, त्याच्या आईचा रडत असताना व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकजण तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एल्विशच्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एल्विशच्या आईची अवस्था पाहून टीव्ही अभिनेता अली गोनीचे हृदय दुखले आहे. यानंतर त्यानं सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं एक्सवर लिहिलं, ''एल्विशच्या आईला व्हिडिओमध्ये रडताना पाहून माझे हृदय तुटले. मला आशा आहे की ती लवकरच तिच्या मुलाला भेटेल आणि भविष्यात तो सर्व वादांपासून दूर राहील अशी मी अशा करतो.''

व्हिडिओचं सत्य : आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओचे सत्य सांगतो. हा व्हिडिओ सात महिन्यापूर्वीचा आहे, जो एल्विशच्या एका जुन्या व्लॉगवरून घेतला गेला आहे. लोक आता खोटे दावे करून हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. आता काहीजणांना एल्विशची आई नाराज असल्याचं लोकांना वाटत आहे. एल्विशची एक्स गर्लफ्रेंड कीर्ती मेहरानं या पोस्टवर पोस्ट करत लिहिलं, ''कमकुवत वेळ आहे तू नाही.'' एल्विश जेव्हा बिग बॉसच्या घरात होता तेव्हा कीर्तीनं दावा केला होता की ती त्याची गर्लफ्रेंड आहे. मात्र एल्विश बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यानं स्पष्ट केलं होतं की किर्तीशी त्याचा कुठलाही संबंध नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण : एल्विश यादवला पोलिसांनी गेल्या रविवारी अटक केली होती. नोएडा पोलिसांनी एल्विशवर कलम 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ड्रग्जशी संबंधित कटात सामील असतो, तेव्हा हा कायदा लागतो. आता तुरुंग प्रशासनाकडून बातमी आली आहे की एल्विश यादवची तुरुंगातील पहिली रात्र निराशेत गेली. नोएडा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवनं कबूल केले आहे की तो राहुलसह अटक केलेल्या सर्व आरोपींना वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये भेटला होता आणि तो त्यांच्या त्यांच्या संपर्कात होता.

हेही वाचा :

  1. सारा अली खानने जान्हवी कपूरसह जिममध्ये गाळला घाम, ट्रेनर घेतली दिव्य परीक्षा
  2. Randeep Hooda Transformation :सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी रणदीप हुड्डानं घटवलं वजन
  3. Nick Jonas to play Holi in India : निक जोनस पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालतीबरोबर भारतात साजरी करणार होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.