ETV Bharat / entertainment

"मला वाद घालायचा नाही", म्हणत अरबाज खाननं दिलं मलायका अरोराला उत्तर - Arbaaz Khan on Malaika Arora - ARBAAZ KHAN ON MALAIKA ARORA

Arbaaz Khan on Malaika Arora : मलायका अरोरा गमतीने सांगते की तिचा मुलगा अरहान खानला त्याचे वडील अरबाज खान याच्याकडून निर्णय न घेण्याचा वारसा मिळाला आहे. अरबाजने आता त्याची माजी पत्नी मलायकाच्या या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

Arbaaz Khan on Malaika Arora
अरबाज खाननं दिलं मलायका अरोराला उत्तर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 6:51 PM IST

मुंबई - Arbaaz Khan on Malaika Arora : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा लग्नाच्या 19 वर्षांनंतर विभक्त झाले होते. दोघांनाही अरहान खान नावाचा सुंदर तरुण मुलगा आहे. अलीकडेच अरहानने त्याची 'डंब बिर्याणी' ही पॉडकास्ट मालिका लाँच केली. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये त्याची आई आणि सरजिता रैयानी सामील झाले आहेत. त्यांच्यातील संभाषणादरम्यान मलायका अरोरानं विनोदाने कमेंट केली की तिच्या मुलाकडे 'निर्णय' न घेण्याचा वडिलांचा गुण वारसा म्हणून मिळाला आहे.

या कमेंटला प्रत्युत्तर म्हणून अरबाज खानला एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आले की मलायकाच्या या कमेंटशी तो सहमत आहे का? यावर प्रतिक्रिया देताना अरबाज म्हणाला की, याबद्दलचा तिचा दृष्टीकोन समजला आणि तिनं बोलून दाखवलेल्या त्याच्याबद्दलच्या विचार स्पष्टता वगैरे सारख्या सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यायचा ठरवलं आहे.

अरबाजने स्पष्ट केले की मलायकाचं मत तिचं स्वतःचे आहे आणि तो त्यावर 'विवाद' करू इच्छित नाही. आई आणि मुलगा यांच्यातील संभाषणाला त्यानं हलके फुलकं घेतलं म्हणत ते गांभीर्याने घेतले नाही. "हे गांभीर्याने घेण्यासारखे काहीही नाही. हा एक मनोरंजक चॅट शो आहे जो आई आणि मुलामध्ये आहे. याचाच अर्थ तिला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटले की ते ठीक आहे. मला काहीही वाद घालायचा नाही. हे तिचे मत आहे," असं अरबाज म्हणाला.

पॉडकास्टमध्ये मलायकानं उल्लेख केला होता की अरहानला त्याच्या वडिलांच्या वागणुकीचा वारसा मिळाला आहे. याबद्दल ती म्हणाली, " अरबाज या गोष्टींबद्दल कधीही ओव्हरबोर्ड करत नाही, तो काही गोष्टींबद्दल खूप स्पष्ट आहे आणि तो गुण तुझ्यामध्ये आहे." असं असलं तरी ती म्हणाली की तो दोलायमान देखील असू शकतो, जे तिला आवडत नव्हते. "परंतु त्याच वेळी, तू देखील त्याच्याप्रमाणेच अत्यंत द्विधावस्थेत अडकलेला असू शकतो, जे माझ्या फारशा आवडीचं नाही,"असं ती म्हणाली.

पहिल्या एपिसोडमध्ये अरहानच्या पॉडकास्टमध्ये त्याचे वडील अरबाज आणि काका सोहेल खान देखील होते. अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2002 मध्ये झाला होता. या जोडप्याने 2016 मध्ये विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला. गेल्या वर्षी अरबाजने एका लोकप्रिय मेकअप आर्टिस्टबरोबरपुन्हा लग्न केलं आहे.

हेही वाचा -

  1. कृष्णा अभिषेकशी असलेल्या वादानंतरही गोविंदानं आरती सिंगच्या लग्नाला लावली हजेरी - Krushna Abhishek
  2. फरदीन खानला 24 वर्षापूर्वी भन्साळी यांनी दिला होता नकार, त्यानंच सांगितला हा भन्नाट किस्सा - Fardeen Khan
  3. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन 14 वर्षांनंतर फॅन्टसी हॉरर चित्रपटासाठी एकत्र - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.