ETV Bharat / entertainment

विद्या बालन आणि इलियाना डीक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार' टीझर रिलीज ; पाहा व्हिडिओ - Do Aur Do Pyaar Teaser OUT - DO AUR DO PYAAR TEASER OUT

Do Aur Do Pyaar Teaser OUT : विद्या बालन आणि इलियाना डीक्रूझ अभिनीत 'दो और दो प्यार' टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.

Do Aur Do Pyaar Teaser OUT
दो और दो प्यार टीझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 4:42 PM IST

मुंबई - Do Aur Do Pyaar Teaser OUT : हिंदी चित्रपटसृष्टीत 17 जानेवारी रोजी 'दो और दो प्यार' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आज 21 मार्च रोजी 'दो और दो प्यार' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरची सुरूवात विद्या बालन आणि प्रतीक गांधीपासून होते. टीझर पाहिल्यानंतर हे लक्षात येते की, या चित्रपटात दोन जोडप्यांमधील प्रेम आणि मतभेद दाखविण्यात आले आहेत. टीझरमध्ये प्रतीक विद्याला आईस्क्रीम ऑफर करतो. यावर विद्या त्याला म्हणते की, "मी विगन आहे."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'दो और दो प्यार' टीझर रिलीज : त्यानंतर प्रतीक तिला म्हणतो की तुझ्या फेशवॉशमध्ये तर दुध आहे. यानंतर इलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधी यांचा प्रेमप्रवास टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते ॲप्लॉज एंटरटेनमेंट आणि इलिपसिस एंटरटेनमेंट आहेत. 'दो और दो प्यार' या चित्रपटासाठी आपल्याला जास्त वाट पाहावी लागणार नाही. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'दो और दो प्यार' या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते श्रीशा गुहा ठाकुरता यांनी केलंय. हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. 'दो और दो प्यार' हा 'द लव्हर्स' 2017 मध्ये रिलीज झालेल्या या विदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल दाखवण्यात आलं होतं.

विद्या बालनचं वर्कफ्रंट : दरम्यान, आता या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अनेकजण 'दो और दो प्यार' पाहण्यासाठी खूप आतुर असल्याचं दिसत आहेत. शेअर केल्या टीझरवर अनेजण कमेंट्स करून विद्या आणि इलियानाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच आई झाल्यानंतर इलियाना पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. दरम्यान, विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी' महिला मंडळी' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. राणी मुखर्जीनं तिच्या 46व्या वाढदिवसानिमित्त पापाराझीबरोबर कापला केक, व्हिडिओ व्हायरल - Rani Mukreji 46th birthday
  2. Stri and Singham : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel
  3. एसएस राजामौली आणि त्याचा मुलगा जपान भूकंपातून बचावले, केली पोस्ट शेअर - SS Rajamouli

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.