ETV Bharat / entertainment

ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या 'फकिरा'ची शौर्यगाथा भाऊराव कऱ्हाडे आणणार रुपेरी पडद्यावर - Fakira movie launch - FAKIRA MOVIE LAUNCH

Fakira movie launch : दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अण्णाभाऊ साठे लिखीत गाजलेल्या 'फकिरा' कादंबरीवर चित्रपट बनवण्याचा संकल्प त्यानं केलाय. या चित्रपटात अनेक दिग्गज मराठी कलाकार काम करत असून याचं लॉन्चिंग नुकतंच पार पडलं.

Fakira movie launch
फकिरा चित्रपट लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 2:18 PM IST

Updated : Apr 16, 2024, 4:08 PM IST

मुंबई -Fakira movie launch : 'ख्वाडा' या पहिल्याच दिग्दर्शकिय पदार्पणाच्या चित्रपटातून सर्वांच लक्ष वेधलेला आणि राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेला भाऊराव कऱ्हाडे हा आता मराठीतील प्रतिभावान दिग्दर्शक असल्याचं सिद्ध झालंय. भाऊरावनं 'ख्वाडा'नंतर 'बबन', 'टीडीएम' अशा वास्तववादी यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. तळगाळात राहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वेदना मांडण्याचं खास कसब त्यानं आत्मसात केलंय. आता त्यानं अण्णाभाऊ साठेंच्या 'फकिरा' या गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचा संकल्प केला आहे. यामधून इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान तो आपल्या चित्रपटातून उलगडणार आहे.

सयाजी शिंदे, अभिनेता

आपल्या आगामी ‘फकिरा’ या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नुकतीच केली. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट तो घेऊन येत आहे.

विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मिती यांच्या या चित्रपटात ‘फकिरा’ ही मध्यवर्ती भूमिका कोण करणार? हे अजून गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची स्नूषा सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंत, चित्रपटाचे डीओपी वीरधवल पाटील, लेखक मंदार जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

‘नशिबाने साथ दिली तर उत्तम कलाकृती साकारायला मिळते. माझ्या नशिबाने ‘फकिरा’ ही कलाकृती साकारण्याचे भाग्य मला मिळाले, याबद्दल दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी समाधान व्यक्त केले. ‘अशा विषयाचा चित्रपट करण्यासाठी अंगी अचाट धाडस असावं लागतं. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे याने हे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असे म्हणत, अभिनेते नागेश भोसले यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. एका उत्तम प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता कमलेश सावंत यांनी व्यक्त केला.

समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वांविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे चित्ररूप रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -

'गदर 2' दिग्दर्शक अनिल शर्मानं 'पुष्पा 2' आणि अल्लू अर्जुनचं केलं कौतुक, पाहा पोस्ट - Allu Arjun

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंत आली त्याच्या समर्थनार्थ पुढे, व्हिडिओ व्हायरल - Rakhi Sawant

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या लॉन्चनंतर पहिल्यांदाच कपिल शर्मानं दिली वैष्णोदेवी मंदिराला भेट - Kapil Sharma

Last Updated : Apr 16, 2024, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.