ETV Bharat / entertainment

'लाल सलाम'चे 21 दिवसांचे फुटेज झाले गायब, ऐश्वर्या रजनीकांतचा खुलासा - Raw Footage of Lal Salaam

'लाल सलाम' दिग्दर्शित केल्यानंतर संकलनाच्यावेळी चित्रपटाचे 21 दिवसाचे फुटेज हरवल्याचा किस्सा ऐश्वर्या रजनीकांतने सांगितला आहे. 10 कॅमेऱ्यांनी शूट केलेले क्रिकेट सामन्याचे फुटेज वाया गेल्यानं कथानक प्रभावी करण्याला मोठा फटका बसल्याचे तिने मान्य केलंय.

Aishwarya Rajinikanth
ऐश्वर्या रजनीकांत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 5:34 PM IST

मुंबई - ऐश्वर्या रजनीकांतने अलिकडेच 'लाल सलाम' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाच्या चित्रीकरणातील काही भागाचे फुटेज हरवल्यामुळे मर्यादित फुटेजसह संकलन करणे कसे कठीण बनले होते याचा किस्सा आश्वर्याने शेअर केला आहे. रजनीकंत चित्रपटात काम करत असल्यामुळे सर्वजणच एका दबावाखाली काम करत होते. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण टीमने लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे चित्रपटाचे गुंतागुंतीचे असलेले कथानक अडचणीत सापडले.

एका डिजिटल प्लॅटफॉर्मशी बोलताना ऐश्वर्याने खुलासा केला की, दहा कॅमेऱ्यांसह शूट केलेल्या क्रिकेट सामन्याच्या महत्त्वपूर्ण सीन्स निष्काळजीपणामुळे सुमारे 21 दिवसांचे फुटेज गायब झाले. "मी म्हणायला पाहिजे की ते बेजबाबदारपणामुळे झाले आहे. आणि ते अतिशय दुर्दैवी होते. आम्ही क्रिकेट सामन्याचे शूटिंग केले होते, आणि तो दहा कॅमेरा सेटअप होता. आम्हाला तो सीन खरा क्रिकेट सामना असल्याप्रमाणे शूट करायचा होता. त्या दहाही कॅमेऱ्यातील फुटेज खराब झाले. अशावेळी काय करायचे हे काहीच सूचत नव्हते", असे ती म्हणाली.

चित्रपटाला वाचवण्यासाठी प्रयत्न करूनही, कलाकारांच्या वेशातील बदलांमुळे पुन्हा शूटिंग अशक्य होते. "समस्या ही होती की विष्णू, सेंथिल आणि अप्पा (रजनीकांत) यांच्यासह सर्वांनीही त्यांचा गेट-अप बदलला होता. त्यामुळे, आम्ही ते पुन्हा शूट करू शकलो नाही. शेवटी, जे काही शिल्लक होते ते आम्ही पुन्हा संकलित केले. ते खूप आव्हानात्मक होते. विष्णू आणि अप्पा सहकार्य करत होते आणि ते पुन्हा करण्यास तयार होते, पण आम्ही ते सर्व पुन्हा शूट करू शकलो नाही," असे दिग्दर्शिका ऐश्वर्या म्हणाली.

'लाल सलाम' चित्रपटाचे फुटेज हरवल्याने ऐश्वर्याला भविष्यातील चित्रपटांसाठी फुटेज सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व कळले. गहाळ दृश्ये मिळाली असती तर चित्रपट अधिक चांगला होऊ शकला असता असे तिने मत व्यक्त केले. विष्णू , विशाल यांच्या भूमिका असलेला आणि रजनीकांतला कॅमिओमध्ये झळकलेला हा चित्रपट, एका क्रिकेट स्पर्धेत राजकीय हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या अशांततेचा सामना करत असलेल्या गावाची कथा दाखवण्यात आली आहे. यात रजनीकांतने साकारलेला मोईदीनभाई दीर्घकाळ स्मरणात राहणारा होता.

हेही वाचा -

  1. आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. सनी देओल स्टारर 'द हिरो'चे निर्माते धीरजलाल शाह यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.